लासलगाव, इगतपुरी : वकील संघटनांचे धरणे वाढीव कोर्ट फी विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:10 AM2018-01-26T00:10:11+5:302018-01-26T00:21:59+5:30
लासलगाव : शासनाने न्यायालियन मुद्रांक शुल्कात वाढ केल्याने कामबंद आंदोलनात निफाड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला.
लासलगाव : महाराष्ट्र शासनाने न्यायालियन मुद्रांक शुल्कात भरमसाठ वाढ केल्याने जिल्हाभर विकलांच्या कामबंद आंदोलनात निफाड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला विशेष म्हणजे निफाडचे आमदार अनिल कदम यांनीही विकलांच्या निषेध आंदलनाप्रसंगि हजर राहुन आपले समर्थन दिले. निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयातील वकिलांनी सकाळपासुन न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेता कामबंद आंदोलन सुरु केले राज्य शासनाने न्यायालयीन मुद्रांक शुल्कात केलेली भरमसाठ वाढ सामान्य जनतेला न पेलविणारी आहे त्यामुळे न्याय सुलभ होणेएवजी महाग होईल यामुळे वाढविलेले मुंद्रांक शुल्क रद्द करावे यासाठी धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला निफाड न्यायालयातील विकलांनी आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी निफाडचे आमदार अनिल कदम यांनी भेट देऊन सामान्य नागरिकांच्या हिताचे? निर्णय होणेसाठी आपणहि प्रयत्न करु असे आश्वासन दिले निफाड विकल संघाचे माजी अध्यक्ष अॅड नामदेवराव ठाकरे यांनी मुद्रांक? शुल्कवाढीचा संपूर्ण घोषवारा केला विकल पक्षकारांसाठी? हा चुकिचा निर्णय असुन त्यांना विचारात न घेता केलेली शुल्कवाढ मान्य नसल्याचे नमुद केले अॅड इंद्रभान रायते यांनी याप्रसंगी पक्षकारांना खिशाला कात्री लावणारा निर्णय न पचणारा आहे व्यापक आंदोलन उभारण्याची गरज विषद केली या निर्णयाने घटनेच्या मार्गदर्शक तत्वांनाच छेद दिला असल्याचे नमुद केले. अॅड आप्पासाहेब निकम यांनी शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे नमुद केले. अॅड अण्णासाहेब भोसले यांनीहि वाढिव शुल्काबाबत पुनिर्वचार करावा सामान्य नागरिकांसाठी न्याय मिळणे गरजेचे आहे मात्र अवाजवी दरवाढ हि सर्वच घटकांना मारक ठरणार आहे ग्रामसभांद्वारे या निर्णयाचा विरोध केला पाहिजे असे सांगिंतले. कोर्ट फीत दुरूस्ती न झाल्यास लोकशाही पध्दतीने तिव्र आंदोलन करु असाही इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी इगतपुरी तालुका वकील संघ बार संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम,उपाध्यक्ष नदीम शेख,सचिव यशवंत कडू,खिजनदार सागर वालझाडे,ग्रंथपाल संजय जगताप,सहग्रंथपाल सुशील गायकर, सदस्य लाला पवार , मनीषा वारंगुसे,रोहित उगले,संजय जगताप,सुनील कोरडे, दिनकर खातळे, जयदेव रिके, विजयमाला वाजे, आर जी वाजे, जितेंद्र शिंदे, डी बी खातळे आदी उपस्थित होते.