लासलगांव बाजार समितीत कांदा भावात २५०० रूपयांची घसरण सर्वाधिक भाव ५२११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:23 PM2019-12-31T23:23:55+5:302019-12-31T23:24:21+5:30

लासलगांव : लासलगांव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३१) कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला.

Lasalgaon Market Committee onion prices fell by Rs | लासलगांव बाजार समितीत कांदा भावात २५०० रूपयांची घसरण सर्वाधिक भाव ५२११

लासलगांव बाजार समितीत कांदा भावात २५०० रूपयांची घसरण सर्वाधिक भाव ५२११

Next
ठळक मुद्दे सर्वसाधारण रु पये ६,७०१ प्रती क्विंटल राहीले

लासलगांव : लासलगांव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३१) कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला.
महाराष्ट्रातील सर्वच कांदा बाजारपेठेत लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व कांदा उत्पादक पुरेसा तयार परिपक्व कांदा लिलावास आणीत नसल्याने मागील सप्ताहाच्या तुलनेत कमाल भावात घसरण होत असुन सोमवारी सर्वाधिक भाव ५७६१ रूपये जाहीर झाला.
लासलगांव बाजार समितीत सोमवारी १९०४ वाहनातील २०,७८६ क्विंटल लाल कांदा १५०० ते कमाल ५७६१ तर सरासरी ४५०१ रूपये भावाने झाला. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची ७१,९४२ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये २,००० कमाल रु पये ८,३०१ तर सर्वसाधारण रु पये ६,७०१ प्रती क्विंटल राहीले होते.
निफाड उपआवारावर लाल कांदा (२,२८६ क्विंटल) भाव रु पये १,५०१ ते ७,३०० सरासरी रु पये ६,००० रूपये तर विंचूर उपबाजार आवारावर लाल कांदा ६६,५५६ क्विंटल भाव रु पये २,००० ते ७,५५१ सरासरी रु पये ६,००० रूपये होते.


 

Web Title: Lasalgaon Market Committee onion prices fell by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.