लासलगाव बाजार समिती सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:52 PM2020-03-20T12:52:36+5:302020-03-20T12:53:14+5:30
लासलगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व उपआवारावर विशेष साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात येत असुन विशेष दक्षता घेऊन लिलाव कामकाज सुरळीत सुरु राहणार आहे.
लासलगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व उपआवारावर विशेष साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात येत असुन विशेष दक्षता घेऊन लिलाव कामकाज सुरळीत सुरु राहणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी जनावरे लिलाव बंद राहतील अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
कांदा आवक ही नाशवंत आहे. तसेच कांदा ,धान्य व भाजीपाला खरेदी न होता बाहेर न गेल्यास देशाच्या विविध भागात मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.सध्या देशात सर्वत्र कोरोनामुळे बंद परिस्थिती आहे. मात्र बाजार समित्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता, बाजार समित्या बंद ठेवणे योग्य होणार नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्र ी मध्ये कोणतीही अडचण न येता ग्राहकांना सुरळीत फळे, भाजीपाला, अन्नधान्य मिळावे यासाठी उपाययोजना कराव्यात असे आदेश पणन संचालक सुनील पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.त्यामुळे शेतीमालाचे लिलाव सुरू राहणार आहेत. फळे भाजीपाला, अन्नधान्य कडधान्ये आदी शेतमाल हा जीवनावश्यक असून, कोरोना विषाणूच्या पाशर््वभूमीवर ग्राहकांना या वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि ग्राहकांअभावी शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत असणे गरजेचे आहे. बाजार समित्यांनी बाजार वेळा संपल्यावर आणि शक्यतो रात्रीच्या वेळी युद्धपातळीवर स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची कामे करण्यात येत आहे.