लासलगावी कांदा दरात १५३ रुपयांची तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:55+5:302021-05-26T04:13:55+5:30
लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्यानंतर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कांदा दरात १५३ रुपयांची तेजी झाली. मंगळवारी ...
लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्यानंतर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कांदा दरात १५३ रुपयांची तेजी झाली. मंगळवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ६२० वाहनांतील १२,८४७ क्विंटल उन्हाळ कांदा ६०० ते १७५३ रुपये व सरासरी १४६० रुपये भावाने विक्री झाला. सकाळी लासलगाव बाजार समितीने ऑनलाइन नोंदीबरोबरच बाजार समितीत काउंटरवर नोंद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे सकाळी लासलगाव बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी नवीन बाजार आवारावर नाव नोंदणीची व्यवस्था केली; परंतु शेतकरी वर्गाने दोन रांगा लावल्या. त्यामुळे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह प्रकाश कुमावत, लासलगाव पोलीस कार्यालयाचे कर्मचारी देवीदास लाड, कैलास महाजन व देवढे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर नाव नोंदणी सुरळीत झाली.
-------------------------
इतर शेतमालाचे किमान, कमाल व सरासरी दर असे
मका - १५५९ - १६६५ - १६००
सोयाबीन - ३५०१ - ७६६० - ७५००
गहू - १७०० - २०५१ - १७४०
बाजरी - १२०० - १४२८ - १४२८
हरभरा - ३५०० - ५३९९ - ५३६०
लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांनी आपल्या वाहनांच्या नोंदणीसाठी केलेली गर्दी. (२५ लासलगाव १)
===Photopath===
250521\25nsk_24_25052021_13.jpg
===Caption===
२५ लासलगाव १