लासलगावी कांद्याला २६७३ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:14 AM2020-09-12T01:14:30+5:302020-09-12T01:14:55+5:30
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्र वारी (दि. ११) ७९०० क्विंटल कांद्याचे लिलाव पार पडले. कांद्याला कमाल २६७३ रुपये दर मिळाला. गुरुवारी १०,२०० क्विंटल कांदा लिलाव होऊन १००० ते २७३५ व सरासरी २४५० रुपये भाव मिळाला. बुधवारी २८६२ रुपये भावाने १६,३०४ क्विंटल कांदा लिलाव झाला.
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्र वारी (दि. ११) ७९०० क्विंटल कांद्याचे लिलाव पार पडले. कांद्याला कमाल २६७३ रुपये दर मिळाला. गुरुवारी १०,२०० क्विंटल कांदा लिलाव होऊन १००० ते २७३५ व सरासरी २४५० रुपये भाव मिळाला. बुधवारी २८६२ रुपये भावाने १६,३०४ क्विंटल कांदा लिलाव झाला.
मंगळवारी ९२४ वाहनातील ११९९२ क्विंटल कांदा लिलाव किमान ८०० ते कमाल २५५४ तर सरासरी २००० रुपये भावाने झाला. गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६५ हजार ६८८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ५०१ कमाल रु पये २४५१ तर सर्वसाधारण रु पये १९०३ प्रतिक्विंटल राहिले. खानगावनजीक येथे हिरवी मिरची व शिमला मिरची लिलाव दररोज दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत सुरू झालेले आहेत, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप व नरेंद्र वाढवणे यांनी दिली.