एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसाकडून पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:44 PM2020-10-18T22:44:17+5:302020-10-19T00:18:57+5:30

लासलगांव : येथील एटीएम मधून पैसे काढून पलायन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील हटकर, आंबेडकर नगर रा. म्हरळगाव (कल्याण)यास लासलगांव पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्याचे दोन साथीदार फरार झाले आहे.

Lasalgaon police exposes ATM money laundering gang | एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसाकडून पर्दाफाश

एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसाकडून पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देदोन साथीदार फरार झाल्याचे संशयिताने सांगितले.

लासलगांव : येथील एटीएम मधून पैसे काढून पलायन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील हटकर, आंबेडकर नगर रा. म्हरळगाव (कल्याण)यास लासलगांव पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्याचे दोन साथीदार फरार झाले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये अरुण कदम (रा. निळखेडे, तालुका येवला हे एटीएम मधून पैसे काढत असताना पैसे बाहेर येत नसल्याने मागे उभ्या असलेल्या इसमाची मदत घेतली असता त्याच्याकडेअसलेल्या बनावट कार्डच्या साह्याने पैसे काढण्याचा प्रयत्र फसला. त्याला लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र दोन साथीदार फरार झाल्याचे संशयिताने सांगितले.

त्याने आपण आपल्या साथीदारांसह देवळा, येवला, लोहा (जिल्हा बीड )येथुन अशाप्रकारे पैसे काढल्याचे कबूल केले. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेची बनावट एटीएम कार्ड व अँड्रॉइड मोबाईल सापडला, तसेच रोख रक्कम ५१ हजार देखिल पोलिसांनी हस्तगत केली.
संशयिताविरुद्ध भादवि ४२०, ४०६, ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, देविदास लाड, कैलास महाजन, प्रदीप आजगे, कैलास मानकर, पूनम शिंदे यांचे पथक तयार करून ताब्यात घेतले. या प्रकरणी लासलगाव पोलीस पुढील तपास करत आहे.
सर्व बॅकेच्या ग्राहकांनी आपण येथे मधून पैसे काढत असताना आपला एटीएम कार्डचा पिन नंबर मागील व्यक्तीस दिसणार नाही याप्रमाणे ऑपरेट करावा, अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देऊ नये असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
 

Web Title: Lasalgaon police exposes ATM money laundering gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.