लासलगावी डाळींब लिलावास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:24+5:302021-06-25T04:12:24+5:30
परिसरातील शेतकऱ्यांनी डाळींब ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे डाळींब लिलावास ...
परिसरातील शेतकऱ्यांनी डाळींब ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे डाळींब लिलावास सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांना वजनमापानंतर लगेच रोख रक्कम देण्यात येणार आहे. डाळींब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असे जगताप यांनी शुभारंभ प्रसंगी सांगितले.
यावेळी गोरख बुल्हे, रा. शिरसगांव लौकी या शेतकऱ्याचा मुहूर्ताचा डाळींब ५ हजार २०० रुपये प्रती क्रेटस् ह्या दराने खरेदी झाला. दिवसभरात ५१२ क्रेटसची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी ४०० व जास्तीत जास्त ५२०० व सरासरी १८०० रुपये याप्रमाणे राहिला.
फोटो- २४ लासलगाव बाजार
===Photopath===
240621\24nsk_41_24062021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ लासलगाव बाजार