लासलगावी निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:56 AM2018-04-20T00:56:54+5:302018-04-20T00:56:54+5:30
लासलगाव : देशात विविध ठिकाणी बालिकांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनांचा निषेध म्हणून लाासलगाव येथील हजारो महिला पुरुषांच्या हातात हजारो मेणबत्त्या पेटवून व भोंगा वाजवून या अभागी बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
लासलगाव : देशात विविध ठिकाणी बालिकांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनांचा निषेध म्हणून लाासलगाव येथील हजारो महिला पुरुषांच्या हातात हजारो मेणबत्त्या पेटवून व भोंगा वाजवून या अभागी बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. लासलगाव येथील वेदिका होळकर, शेखर होळकर, गुणवंत होळकर, गोकुळ पाटील, सचिन होळकर, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश पाटील, डॉ. विकास चांदर, रेवती होळकर, ललित दरेकर, कैलास केदारे आदींचा सहभाग होता. यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत, संतोष पानगव्हाणे, राम शेजवळ, मौलाना फारून, डॉ. अमोल शेजवळ, कैलास केदारे, रेश्मा पालवे, गुणवंत होळकर तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी निषेध करून कायद्यात बदल करावा, अशी मागणी केली. याप्रसंगी किशोर गोसावी व विकास चांदर यांनी सूत्रसंचालन केले. उत्स्फूर्त प्रतिसादनुकत्याच झालेल्या बालिकेवरील झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी लासलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून हजारो महिला व पुरुषांच्या विराट निषेध मोर्चाने निषेध व्यक्त केला. या निषेध मोर्चात सहभागी महिला व पुरुषांच्या दंडावर काळ्या फिती लावण्यात आल्या होत्या.