दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी लासलगावच्या विद्यार्थ्याची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 02:39 PM2019-12-23T14:39:45+5:302019-12-23T14:39:57+5:30
लासलगाव: येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील ओमकार भालेराव या विद्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवड झालेली आहे .
लासलगाव: येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील ओमकार भालेराव या विद्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवड झालेली आहे . कुमार ओमकार याने आतापर्यंत ९० दिवसांचे प्रशिक्षण व पात्रता फेरी पूर्ण केलेली आहे .सदर पात्रते मध्ये मुंबई ,नागपूर ,पुणे , औरंगाबाद ,नगर विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता .या सर्व विभागातून संस्कृतिक विभागातून त्याची निवड झालेली आहे .उत्कृष्ट गायन , उत्कृष्ट वादन व उत्कृष्ट कीर्तनकार या गुणांच्या आधारावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचे तो नेतृत्व करणार आहे . दिनांक २६ जानेवारी २०२० दरम्यान होणार्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक विभागातून त्याची निवड झालेली आहे. ओमकारची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असून वडिलांचे छत्र लहानपणीच म्हणजे तो पंधरा दिवसांचा असतानाच हरपले आहे. आई वनिता भालेराव शिवणकाम करून आपला उदरिनर्वाह करते. अशा परिस्थितीतही त्या माऊलीने खचून न जाता या मुलावर संस्कार केलेले आहे .ओमकार हा सावरगाव तालुका निफाड येथून दररोज शाळेत येतो. म्हणजे जवळजवळ वीस किलोमीटर तो दररोज ये-जा करतो हलाखीच्या परिस्थितीत खचून न जाता उत्तम यशाचा डोंगर कसा सर करावा याचे उत्तम उदाहरण त्याने विद्यार्थ्यांपुढे ठेवलेले आहे .त्याला विद्यालयाचे संगीत शिक्षक दत्तात्रय मरकड व एनसीसी आॅफिसर प्रमोद पवार यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली त्याने दिल्लीपर्यंतचे स्वप्न पूर्ण केले आहे .