लासलगाव,वणीत कांदा तीन हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:27 PM2020-09-18T21:27:02+5:302020-09-19T01:24:02+5:30
लासलगाव/वणी : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांदा आवक कमी झाली असुन ५०६ वाहनातील ५९०० क्विंटल कांदा 1000 ते 3072 रूपये तर सरासरी 2400 रूपये सरासरी भाव जाहीर झाला.
लासलगाव/वणी : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांदा आवक कमी झाली असुन ५०६ वाहनातील ५९०० क्विंटल कांदा 1000 ते 3072 रूपये तर सरासरी 2400 रूपये सरासरी भाव जाहीर झाला. मंगळवारी कांदा लिलाव पुर्ववत सुरू होऊन 697वाहनातील 9044 क्विंटल उन्हाळ कांदा 1000 ते 2951 रूपये तर सरासरी भाव 2470 रूपये होते. तर काल लिलाव बंद झाल्याने 6 वाहनातील 82 क्विंटल कांदा 1280 ते 2200 रूपये भावाने विक्री झाला होता.
वणी उपबाजारात 4500 क्विंटल आवकृ 3100 रुपये प्रति क्विंटल कांदा दर - वणी- निर्यातबंदीनंतर कांदा उत्पादकांमधे नाराजीचा सुर कायम असुन निर्यात बंदी हटविण्यासाठी सरकारला साकडे घातले जात आहे अशा स्थितीत कांदा खरेदि विक्री सुरु राहण्यासाठी उत्पादक व व्यापारी यांच्या सकारात्मक भुमिकेमुळे आज 4500 क्विंटल कांद्याची आवक झाली . उपबाजारात 134 वाहनामधुन सदर कांदा उत्पादकांनी विक्री साठी आणला होता. 3100 रुपये कमाल 1500 रुपये किमान तर 2600 रुपये सरासरी प्रति क्विंटल अशा दराने कांदा खरेदी विक्री व्यवहार पार पडले. गोल्टी कांद्याला मिळालेला भाव 2370 कमाल ,1000 किमान , तर 1800 रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला. देशांतर्गत कांद्याला मागणीअसली तरी निर्यातबंदी झाल्याने उत्पादकांना सध्यस्थितीपेक्षा अधिक दर मिळाले असते अशा भावना उत्पादकांच्या आहेत.मात्र यातुन मार्ग निघण्याच्या अपेक्षा आहेत.