लासलगावी पावसाचे पाणी दुकानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:35 AM2017-10-11T00:35:56+5:302017-10-11T00:36:23+5:30
शहर व परिसराला मंगळवारी दुपारी परतीच्या पावसाने झोडपले. पावसाचा जोर प्रचंड असल्याने लासलगाव काही तासातच जलमय झाले. शिवाजी चौकातील दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकºयांचीही धावपळ उडाली.
लासलगाव : शहर व परिसराला मंगळवारी दुपारी परतीच्या पावसाने झोडपले. पावसाचा जोर प्रचंड असल्याने लासलगाव काही तासातच जलमय झाले. शिवाजी चौकातील दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकºयांचीही धावपळ उडाली.
पावसामुळे अनेक शेतातील काढलेला मका वाहून गेला. द्राक्षबागांमध्ये पाणी साठले. त्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. परतीच्या पावसामुळे द्राक्ष, कांदा, मका, सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. सध्या सोयाबीन पिकाची सोंगणी सुरू असल्याने या परतीच्या पावसाने शेतकरीवर्गाची चिंता आणखीनच वाढली आहे. बाजारात माल विकण्याची वेळ आली असताना आलेल्या पावसाने नुकसान केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वणी व परिसरात मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आठवडे बाजारातील व्यावसायीकांची तारांबळ उडाली. सोयाबीन, टमाटा, द्राक्षबाग, भुईमग या पीकांना पावसाचा फटका बसला. दुपारी जोरदार पर्जन्यवृष्टीस प्रारंभ झाला. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता.