लासलगावी कांद्याला हंगामातील विक्रमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:36 PM2019-11-02T12:36:18+5:302019-11-02T12:36:28+5:30

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी या हंगामात निच्चांकी कांदा आवक होवून शनिवारी कांद्याला हंगामातील विक्रमी ५३६९ रूपये भाव जाहीर झाला.

 Lasalgavi onion season sales record | लासलगावी कांद्याला हंगामातील विक्रमी भाव

लासलगावी कांद्याला हंगामातील विक्रमी भाव

Next

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी या हंगामात निच्चांकी कांदा आवक होवून शनिवारी कांद्याला हंगामातील विक्रमी ५३६९ रूपये भाव जाहीर झाला. या हंगामात दि.१९ सप्टेंबर रोजी ५१०० रूपये भाव होता. शनिवारी सकाळी सत्रात २१ वाहनातील २३७ क्विंटल कांदा झाली. त्यामुळे कांद्याला किमान १८९१ ते कमाल ५३६९ रूपये तर सरासरी ४९०१ भावाने विक्र ी झाला. शुक्र वारी.दि. १ नोव्हेंबर रोजी कांदा आवक २४९२ क्विंटल कांदा लिलाव किमान २१०० ते कमाल ४८०१ व सरासरी ४५५१ रूपये भाव मिळाला होता. गुरूवारी कांदा आवक कमी झाल्याने व दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रूपयांची कमाल भावात तेजी होती.

Web Title:  Lasalgavi onion season sales record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक