लासलगावी उन्हाळ कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 12:00 AM2020-04-08T00:00:11+5:302020-04-08T00:00:28+5:30
लासलगाव येथील बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव मंगळवारी (दि.७) पूर्ववत सुरू झाले, परंतु लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. मुख्य बाजार आवारात ५७२ वाहनातील २६ हजार ८६५ बारदान गोणीतील लाल कांदा लिलाव ४०० ते ९०० व सरासरी ८०० रुपये तर उन्हाळ कांदा ५०० ते १३७१ रूपये व सरासरी १२०० रूपये प्रतिक्विंटल भावाने झाला. विंचूर येथे ५५१ तर निफाड येथील उपआवारावर २०८ वाहनातील कांदा आवक झाली.
लासलगाव : येथील बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव मंगळवारी (दि.७) पूर्ववत सुरू झाले, परंतु लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. मुख्य बाजार आवारात ५७२ वाहनातील २६ हजार ८६५ बारदान गोणीतील लाल कांदा लिलाव ४०० ते ९०० व सरासरी ८०० रुपये तर उन्हाळ कांदा ५०० ते १३७१ रूपये व सरासरी १२०० रूपये प्रतिक्विंटल भावाने झाला. विंचूर येथे ५५१ तर निफाड येथील उपआवारावर २०८ वाहनातील कांदा आवक झाली.
आठ दिवसानंतर सुरू झालेल्या कांद्याचे लिलाव बघता पूर्वीच्या तुलनेत कांद्यास बºयापैकी बाजारभाव मिळतील ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आशा फोल ठरली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाºयांकडे मजूर नसल्याने शेतकºयांना कांदा गोणी, बारदानामध्ये भरून आणावा लागत आहे. यामुळे शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यातच कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. आठ दिवसांपूर्वी अर्थातच ३० मार्चला येथे लाल कांद्यास प्रतिक्विंटल मिळालेले कांदा बाजारभाव बघता या सप्ताहात लाल कांदा किमान बाजारभावात ३०० रुपये, कमाल बाजारभावात ५०० तर सरासरी बाजारभावात १०१ रु पयांनी घसरण झाल्याचे यावेळी दिसून
आले.
नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार आवारावर कांदा लिलाव खुल्या पद्धतीने करण्याचे आदेश नाशिकचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिलेले असले तरी नाशिक जिल्ह्यात बहुसंख्य बाजार आवारावर कांदा लिलाव गोणी पद्धतीने झाल्याने थेट व्यापारी वर्गानी सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला जुमानले नसल्याचे दिसून आले. कांदा गोणीचा खर्च येत असल्याने कांदा उत्पादकांचे नुकसान टाळता यावे याकरिता कांदा लिलाव बारदान गोणीत न होता खुल्या पद्धतीने होणार असून देशभरात कांदा व शेतमालाची पाठवणी व्हावी यासाठी शासकीय अधिकारी गतिमान झाले आहेत, परंतु काही आवारावर गोणी पद्धतीने लिलाव झाले. काही बाजार आवारात दि.७ तर काही आवारात ९ एप्रिलपासून खुल्या पद्धतीने लिलाव होणार आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद होते. मंगळवारपासून हे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. कांदा हा जीवनावश्यक वस्तू असल्याने कांद्याचा पुरवठा सुरू राहावा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे आता लिलाव सुरू राहणार आहेत.
- सुवर्णा जगताप, सभापती, बाजार समिती, लासलगाव
सध्या मिळत असलेल्या भावामुळे उत्पादन खर्चदेखील सुटत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. निर्यातबंदी जरी उठवली तरी अनेक देशांमध्ये कांद्याची निर्यात बंद आहे. यामुळे आवक वाढली तर मागणी घटली आहे. कांद्याला भाव मिळत नाही. पंधराशेच्या पुढे दर मिळाला पाहिजे.
- राजाबाबा होळकर, कांदा उत्पादक शेतकरी.