लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:50 PM2019-07-14T22:50:51+5:302019-07-15T00:59:55+5:30

जीर्ण झालेल्या लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेची नादुरुस्त असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करताना लासलगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड कारच्या धडकेत ठार झाले.

Lassalgaon Gram Panchayat employee dies | लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

विंचूर परिसरात सतत नादुरुत होणाºया जलवाहिनीचे खोदकाम करताना अपघात होऊन कर्मचारी ठार झाला.

Next
ठळक मुद्देपाइपलाइन दुरुस्ती करताना कारने दिली धडक

विंचूर/लासलगाव : जीर्ण झालेल्या लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेची नादुरुस्त असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करताना लासलगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड कारच्या धडकेत ठार झाले.
लासलगाव ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड (३३) हे आपल्या सहकार्यासह विंचूर येथील के.के.कलेक्शनसमोर जलवाहिनीची दुरुस्ती करत असताना भरधाव ह्युंदाई वरना कारने त्यांना धडक दिली. यात गरड ठार झाले, तर सहकर्मचारी सागर शंकर गांगुर्डे जखमी झाले. रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सागर गांगुर्डे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी खडक माळेगाव येथील संशयित कारचालक गिरीश दौलत रायतेविरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. अधिक
तपास सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन, सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गायकवाड व बाळासाहेब घुगे करीत आहेत
कर्मचारी सागर गांगुर्डे जखमी
लासलगाव-विंचूर रस्त्यावर के.के. कनेक्शनसमोर लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेच्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम कर्मचारी करीत होते. रविवरी पहाटे विंचूरकडून लासलगावच्या दिशेने भरधाव येणाºया ह्युंदाई वरना कारने (क्र . एमएच १५ जीआर ९६१४) जोरदार धडक दिल्याने या अपघातात भागवत गरड (३३) हे ठार झाले, तर कर्मचारी सागर शंकर गांगुर्डे जखमी झाले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Lassalgaon Gram Panchayat employee dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.