लासलगावी कांद्याला २७३१ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:14 AM2017-10-11T00:14:59+5:302017-10-11T00:15:18+5:30

येथील बाजारात सोमवारी (दि.९) उन्हाळ कांद्याला किमान १२०० रुपये ते कमाल २७३१ व सरासरी २४५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी पाचशे रुपयांनी भाव वाढले.

Lassalgavi Onion Rs 2731 | लासलगावी कांद्याला २७३१ रुपये भाव

लासलगावी कांद्याला २७३१ रुपये भाव

Next

लासलगाव : येथील बाजारात सोमवारी (दि.९) उन्हाळ कांद्याला किमान १२०० रुपये ते कमाल २७३१ व सरासरी २४५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी पाचशे रुपयांनी भाव वाढले.
लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी २१,४८७ क्विंटल कांद्याचा लिलाव होऊन २२२२ रुपये हा सर्वाधिक भाव जाहीर झाला होता. शुक्रवारी किमान १००० ते कमाल भाव २२२२ रुपये व सरासरी भाव २०२० होते. पावसामुळे कर्नाटकमधील नवीन कांदा खराब निघाल्यामुळे इतर राज्यात जाणारा कर्नाटकचा कांदा कमी झाला, परिणामी लासलगावच्या कांदा बाजार समितीतील कांद्याला मागणी वाढून भाव वाढल्याचे दिसत आहे. पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे. तर मध्य प्रदेश राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे मध्य प्रदेशातून या कालावधीमध्ये इतर राज्यात जाणारा कांदा गेला नाही. कांद्याच्या भावात तेजी दिसत असली तरी गेल्या सहा-सात महिन्यांपासून साठवणूक केलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत. पाच-सहा महिन्यापासून साठवलेल्या कांद्याचे वजन कमी होते. तसेच साठवणुकीमुळे खराब होणाºया कांद्याला चाळीबाहेर फेकले जाते. त्यामुळे कांद्याच्या भावात तेजी आली तरी प्रत्यक्ष या तेजीचा फारच कमी लाभ कांदा उत्पादकांना होणार आहे. विंचूर उपबाजार आवारावर बुधवारपासून कांदा लिलाव होणार आहे.
आठवड्याच्या प्रत्येक सोमवार, बुधवार व शनिवार या तिन्ही दिवशी दिवसभर कांदा लिलाव होणार आहे तसेच शेतकरी बांधवांनी आपली चुकवतीची रक्कम आपल्या बँक खात्यावर मिळणेसाठी मालविक्रीस आणताना राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची व आधार कार्डची झेरॉक्स प्रत बरोबर आणावी, असे आवाहनही बाजार समिती सूत्रांनी केले.

Web Title: Lassalgavi Onion Rs 2731

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.