८८ केबलचालकांना अखेरची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:51 AM2017-09-13T00:51:55+5:302017-09-13T00:51:55+5:30
नाशिक : करमणूक कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºया केबलचालकांना अखेरची संधी देण्यात आली असून, आठ दिवसांत त्यांनी पैसे न भरल्यास प्रक्षेपण खंडित करण्याबरोबरच त्यांचे बॅँकेचे खाते गोठविण्याची तयारी जिल्हा करमणूक विभागाने चालविली आहे.
नाशिक : करमणूक कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºया केबलचालकांना अखेरची संधी देण्यात आली असून, आठ दिवसांत त्यांनी पैसे न भरल्यास प्रक्षेपण खंडित करण्याबरोबरच त्यांचे बॅँकेचे खाते गोठविण्याची तयारी जिल्हा करमणूक विभागाने चालविली आहे.
१ जुलैपासून देशात एक कर प्रणाली म्हणजेच जीएसटी लागू केल्यामुळे करमणूक कराची वसुली त्या त्या स्थानिक संस्थांकडे सोपविण्यात आली असली तरी, ३१ जून अखेरपर्यंतची वसुली करमणूक कर विभागाने करावयाची असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील २४४ केबलचालकांकडे जवळपास दीड कोटी रुपयांची थकबाकी होती. ती वसुलीसाठी त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या, त्यापैकी काही केबलचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आपल्याकडील थकबाकी शासन जमा केली.
काही केबलचालकांनी या नोटिसांना दाद दिली नाही. अशा केबलचालकांचे प्रक्षेपण खंडित करण्याचे आदेश करमणूक कर विभागाने एमएसओंना दिले होते व त्यासाठी थकबाकीदार केबलचालकांची यादीही जोडली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात काही केबलचालकांनी एमएसओ बदलल्यामुळे असे केबलचालक शोधण्यात अडचणी निर्माण
झाल्या.
२४४ पैकी ८८ केबलचालकांनी अद्यापही करमणूक कर विभागाला प्रतिसाद दिला नाही, मात्र दीड कोटी रुपयांपैकी जवळपास एक कोटी रुपये आजवर वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे करमणूक कर विभागाने थकबाकीदार केबलचालकांना पुन्हा नोटिसा देऊन आठ दिवसांची मुदत दिली असून, त्यांनी पैसे न भरल्यास त्यांचे बॅँक खाते सील करण्यात येणार आहे.