सखींच्या आग्रहास्तव नोंदणीची सदस्यता शेवटची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:32+5:302021-03-17T04:15:32+5:30
‘लोकमत सखी मंच’च्या वतीने वर्षभर विविध प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजन, व्यक्तिमत्त्वव विकास, सदाबहार गाणी, सिनेतारकांच्या भेटी, मस्ती, धूम नृत्याचे अनेकानेक ...
‘लोकमत सखी मंच’च्या वतीने वर्षभर विविध प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजन, व्यक्तिमत्त्वव विकास, सदाबहार गाणी, सिनेतारकांच्या भेटी, मस्ती, धूम नृत्याचे अनेकानेक कार्यक्रम सादर केले जातात. तसेच अनेक प्रकारचे अभिनव उपक्रम करून महिलांच्या कलागुणांना, आनंदाला वाव मिळवून दिला जातो. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सखी मंच सदस्यत्वाची नोंदणी आवश्यक असते. यंदाच्या सखी मंच सदस्यता नोंदणीसाठी केवळ ५०० रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्यात ८०० रुपयांचा सिध्विक बाथरूम ४ पीस सेट आणि सखी मंच सिक्रेट रेसिपीज बुक मोफत मिळणार आहे. तसेच सहभागी होणाऱ्या सखींना डायमंड धमाका योजनेअंतर्गत हिऱ्याचे दागिने तसेच टकले ज्युएलर्सचे १०० रुपयांच्या नथचे, करिश्मा फॅशन ॲक्सेसरीजचे १०० रुपयांचे मंगळसूत्र सेट, सोनी डिझायनर स्टुडिओचे १०० रुपयांचे डिझायनर आकर्षक ब्लाऊज पीसची भेट देण्यात येणार आहे. सखी मंच सदस्यत्व नोंदणीसाठी लोकमतचे शरणपूर रोड कार्यालय किंवा लोकमत भवन, बी-३, एमआयडीसी, अंबड येथील कार्यालयात येऊन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या वेळेत नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांना ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
इन्फो
गडगडाटी हास्याचे तुफान ‘यदा कदाचित’ !
१) लोकमत सखी मंच सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अडीच दशकाहून अधिक काळ रंगभूमीवर गडगडाटी हास्याची कारंजी उसळविणारे आणि झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स विजेत्या तुफानी ‘यदा कदाचित’ नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन लोकमत सखी मंचच्या वतीने रविवारी (दि. २१ मार्च) करण्यात आले आहे.
२)कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून कालिदास कलामंदिर येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजता या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकाने सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर हाऊसफुल्लचा बोर्ड लावला असून, नाशिकला प्रदीर्घ काळानंतर होत असल्याने प्रेक्षकांनादेखील नाटकाबाबत उत्सुकता आहे.
३) नाटकासाठी सखी मंच सदस्य व कुटुंबीयांकरिता प्रत्येकी केवळ १०० रुपये व इतरांसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच तिकिटावरच चितळे एक्सप्रेसचे ७५ रुपयांचे मोफत खरेदी कुपन नागरिकांना मिळणार असून, त्यावर २१ तारखेपासूनच वस्तू मिळू शकणार आहेत. नाटकाची तिकिटे लोकमत शहर कार्यालय, शरणपूर रोड तसेच लोकमत अंबड कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत.