दोन महिन्यांपूर्वी पत्नीशी अखेरचा संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:08 PM2020-06-26T23:08:24+5:302020-06-27T01:30:42+5:30
पत्नी सारिका हिच्याशी जवान सचिन मोरे यांचे बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मला आता तुझ्याशी बोलता येणार नाही. कारण तिकडे रेंज नाही. मुलांच्या तब्येती कशा आहेत. माझी वाट बघू नको, असे सांगून गेले आणि त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. काय बोलायचे ते पटापट बोलून घेतले होते. त्यामुळे आमचे दोन महिन्यांपासून बोलणेच झाले नव्हते, असे त्यांची पत्नी सरिता मोरे यांनी सांगितले.
मालेगाव : पत्नी सारिका हिच्याशी जवान सचिन मोरे यांचे बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मला आता तुझ्याशी बोलता येणार नाही. कारण तिकडे रेंज नाही. मुलांच्या तब्येती कशा आहेत. माझी वाट बघू नको, असे सांगून गेले आणि त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. काय बोलायचे ते पटापट बोलून घेतले होते. त्यामुळे आमचे दोन महिन्यांपासून बोलणेच झाले नव्हते, असे त्यांची पत्नी सरिता मोरे यांनी सांगितले.
वीरजवान सचिन मोरे आता दोन वर्षात सेवानिवृत्त होणार होते. त्यातले दोन-चार महिने झालेही होते. म्हणजेच दीड वर्षानंतर घरी परतल्यानंतर काय काय करायचे याचे ‘स्वप्न’ मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यांनी काही योजना आखल्या होत्या. वर्षभरापूर्वी नाशकात नवीन ‘फ्लॅट’ विकत घेतला होता.
मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून नाशकात ‘स्थायिक’ व्हायचे त्यांनी ठरवले होते; मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. सेवानिवृत्ती काठावर येऊन ठेपलेली असतानाच ‘नियती’ने डाव साधला अन् त्यांचे ‘नव्या’ जीवनाचे स्वप्न अधुरे राहिले. सचिनला सात महिन्यांचा मुलगा, ९ आणि ७ वर्षाच्या दोन मुली आहेत. मुलाचा जन्म झाला त्यावेळी तो भेटायला आला होता. लहान कार्तिकचे ‘पितृछत्र’ हरपल्याने ग्रामस्थ भावनाविवश झाले होते.