नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांची अखेरची महासभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 02:54 PM2019-11-19T14:54:46+5:302019-11-19T14:58:16+5:30
नाशिक- महापौरांच्या कारकिर्दीतील अखेरची महासभा तहकुब करण्याची नामुष्की रंजना भानसी यांच्यावर मंगळवारी (दि.१९) आली. १९९२ मध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट लागू झाल्यानंतर कोणत्याही महापौरांना त्यांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा तहकुब करण्याची वेळ आली नव्हती. मात्र मंगळवारी झालेल्या महासभेच्या वेळी सभागृहात अवघे आठ नगरसेवकच उपस्थित असल्याने भानसी यांना सभा तहकुब करावी लागली. त्यामुळे त्यांच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदविला गेला आहे.

महापौरपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी (दि.२२) होणार आहे. त्यामुळे मावळत्या महापौर रंजना भानसी यांच्या कारकिर्दीतील ही अखेरची महासभा होती. महापौरपदाच्या निवडणूकीमुळे भाजप, कॉँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही पक्षांचे नगरसेवक सहलीवर गेले असून त्यामुळे शहरात मोजकेच नगरसेवक शिल्लक आहेत. महासभेच्या वेळेत तर सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, नगरसेवक बाजीराव भागवत, डॉ. हेमलता पाटील, गजानन शेलार, गुरमित बग्गा, सुनील गोडसे, सलीम शेख आदी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन्, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नाशिकच्या गायिका गीता माळी तसेच महापालिकेचे अभियंता अनिल नरसिंगे यांच्यासह अन्य दिवगंत मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करून महासभा तहकुब करण्यात आली.
या महासभेत अनेक महत्वाचे विषय चर्चेला होते. यात प्रामुख्याने नाशिक महपाालिकेच्या वतीने पीपीपी अंतर्गत सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे, सिंहस्थ कामातील पाणी पुरवठ्याच्या विविध कामांसाठी अतिरीक्त १७ कोटी रूपये देणे अशा प्रकारचे महत्वाचे विषय चर्चेसाठी होते. महासभा तहकुब झाल्याने हे सर्व विषय बाजूला पडले आहेत.