भाक्षीच्या जवानाला अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:34+5:302021-04-16T04:14:34+5:30
स्वप्नील यांचे जम्मू सीबीएस भालरा सेक्टर याठिकाणी अंतर्गत प्रशिक्षण सुरू होते. यादरम्यान मंगळवारी (दि.१३) पहाटे बंकरमध्ये आग लागली. ...
स्वप्नील यांचे जम्मू सीबीएस भालरा सेक्टर याठिकाणी अंतर्गत प्रशिक्षण सुरू होते. यादरम्यान मंगळवारी (दि.१३) पहाटे बंकरमध्ये आग लागली. या आगीत चार जवान होरपळून गंभीर जखमी झाले. त्यात स्वप्नील नव्वद टक्के भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्नील यांचे पार्थिव बुधवारी (दि.१४) सकाळी १० वाजता जम्मूहून विशेष विमानाने मुंबईत आणले. मुंबईहून दुपारी ३ वाजता रुग्ण वाहिकेने सटाणा येथे आणण्यात आले. यावेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्वप्नील यांना पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर ताहाराबाद रस्ता या प्रमुख मार्गाने त्यांच्या भाक्षी येथील राहत्या घरी पार्थिव नेण्यात आले. स्वप्नीलचे पार्थिव पाहताच वडील आमलक, आई प्रमिला ,भाऊ तेजस ,बहीण मयुरी यांनी एकच आक्रोश केला. सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. पार्थिव अर्धा तास अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या घरापासून फुलांनी सजवलेल्या वैकुंठ रथावर अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. याप्रसंगी जिल्हा सैनिक अधिकारी अविनाश रसाळ ,ज्ञानेश्वर शिंदे ,सुभेदार बाबूला बहरा ,अमोल पवार ,सहयक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी सलामी दिली. रात्री ९ वाजता स्वप्नील यांचा सात वर्षांचा पुतण्या स्वामी याने अग्निडाग दिला.
इन्फो
मान्यवरांकडून मानवंदना
मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी स्वप्नील यांच्या संपूर्ण परिवाराची वैद्यकीय सेवा आपण मोफत करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. अंत्यसंस्कारस्थळी पार्थिव येताच आ. दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे ,तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील ,पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, वीर पत्नी कल्पना रौंदळ, रेखा खैरणार यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
फोटो- १५स्वप्नील रौंदळ -१
जवान स्वप्नील रौंदळ यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना आई, वडील, बहीण, भाऊ व आप्तेष्ट.
===Photopath===
150421\15nsk_46_15042021_13.jpg
===Caption===
फोटो- १५स्वप्निल रौंदळ -१ जवान स्वप्नील रौंदळ यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतांना आई, वडील, बहीण, भाऊ व आप्तेष्ट.