अकरावी प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:21 AM2018-09-08T01:21:06+5:302018-09-08T01:21:32+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आता अंतिम फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी देण्यात आली असून, बुधवारपर्यंत (दि. १२) दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शहरातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीच्या नियमित परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आता अंतिम फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी देण्यात आली असून, बुधवारपर्यंत (दि. १२) दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शहरातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीच्या नियमित परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आतापर्यंत नियमित चार फे ऱ्यांनंतर एक विशेष आणि थेट प्रवेशाची एक फेरी अशा एकूण सहा फेºयांमध्ये ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निचित झाले असून, जुलै-आॅगस्ट महिन्यात झालेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल २८ आॅगस्टला जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण व एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांनाही अकरावी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रवेशप्रक्रिया १२ सप्टेंबरपर्यंत तीन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या गटात ६० टक्क्यांहून अधिक गुण असणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, शुक्रवारपर्यंत (दि. ७) दुसºया टप्प्यासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारपासून (दि. ८) दुसºया टप्प्यातील म्हणजेच ३५ टक्क्यांहून अधिक गुण असणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, तिसºया व शेवटच्या टप्प्यात एटीकेटी प्राप्त (एक किंवा दोन विषय अनुत्तीर्ण) विद्यार्थ्यांना दि. ११ व १२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अकरावीसाठी आता ४४७३ जागांसाठी १५०६ पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज त्वरित भरून तत्काळ प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.