गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी शेवटचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:30 AM2019-05-07T00:30:22+5:302019-05-07T00:30:39+5:30

नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंदील दर्शविला असून, शेकडो किलोमीटर नदीमार्गे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होऊ नये म्हणून नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्याच्या त्याचबरोबर चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

Last revision for Marathwada from Gangapur dam | गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी शेवटचे आवर्तन

गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी शेवटचे आवर्तन

Next
ठळक मुद्देनगरलाही पाणी देणार : चोरी रोखण्यासाठी गावे अंधारात

नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंदील दर्शविला असून, शेकडो किलोमीटर नदीमार्गे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होऊ नये म्हणून नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्याच्या त्याचबरोबर चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
सदरचे पाणी औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर आणि अहमदनगर जिल्ह्णातील कोपरगाव, शिर्डी, राहाता या नगरपालिकांची तहान भागविणार आहे. त्यासाठी गंगापूर व दारणा समूहातील (गंगापूर, मुकणे, दारणा, वालदेवी) या धरणातून २ हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सोमवारी सायंकाळी उशिरा गोदावरी व दारणा नदीमार्गे हे पाणी पुढे झेपावले. या पाण्याचा लाभ नाशिक शहरासह भगूर, कॅन्टोन्मेंट, सिन्नर एमआयडीसी, सायखेडा, चांदोरी, निफाड तालुक्यांसाठी होणार आहे. तसेच नांदूरमधमेश्वरमधून हे पाणी पुढे डाव्या व उजव्या कॅनॉलव्दारे वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहात्याला पोहोचेल.
याशिवाय सटाणा शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केळझर धरणातून सटाणा शहरासाठी १०० दलघफू पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. केळझर धरणातून आरम नदीमार्गे हे पाणी सोडण्यात येणार आहे. गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाचालू वर्षातील हे शेवटचे आवर्तन असल्याने ते संबंधित गावापर्यंत पोहोचावे, वाटेत या पाण्याची चोरी होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. त्यासाठी आगामी पंधरा दिवस पाण्याच्या वहन मार्गावर रोज २२ तास वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच अवैध पाणी उपसा करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Last revision for Marathwada from Gangapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी