...अखेर घडली ‘त्या’ माय-लेकाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:27 AM2019-04-02T01:27:13+5:302019-04-02T01:27:39+5:30

नाशिक : मानसिक धक्का म्हणा किंवा एखाद्या घडलेल्या कौटुंबिक घटनेवरून झालेल्या गैरसमजुतीतून ६१ वर्षीय ‘ती’ माउली दोन ते तीन ...

... the last time I met 'My- | ...अखेर घडली ‘त्या’ माय-लेकाची भेट

...अखेर घडली ‘त्या’ माय-लेकाची भेट

Next
ठळक मुद्देआजीबाई थेट आयुक्तालयात : आई घरात आल्याने कुटुंब परिपूर्ण झाल्याची भावना

नाशिक : मानसिक धक्का म्हणा किंवा एखाद्या घडलेल्या कौटुंबिक घटनेवरून झालेल्या गैरसमजुतीतून ६१ वर्षीय ‘ती’ माउली दोन ते तीन वर्षांपूर्वी मुलाचे घर सोडून बाहेर पडली. विविध रेल्वेस्थानकावर ही माउली दिवसरात्र काढत होती अन् त्यांचा मुलगा त्यांच्या शोधात वणवण भटकं ती करत होता. ‘त्या’ माउलीची रेल्वेस्थानकावरील चित्रफित सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाली. याबाबत ‘लोकमत’मधूनही वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. यानंतर प्रमिला पवार (आजीबाई) स्वत: सोमवारी (दि.१) पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीबाहेर येऊन बसल्या. यावेळी एका तरुणाचे लक्ष आजीबार्इंकडे वेधले गेले. त्याने आजींची विचारपूस करत त्यांच्या इच्छेनुसार पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांच्यासोबत भेट घडवून दिली.
‘मला दोन मुले आहेत. एक पीएसआय, तर दुसरा कंडक्टर...’ असा संवाद असलेली मुंबईच्या रेल्वेस्थानकावर एक आजीबाई बोलतानाची चित्रफित आठवडाभरापासून व्हॉट््सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून राज्यभर गाजत होती. चित्रफितीमध्ये आजीबाई इंदिरानगर, नाशिकरोड या भागाचे नाव घेतल्यामुळे त्या चित्रफितीचा थेट संबंध नाशिकशी असल्याचे उघड झाले. आजीबाईने चित्रफितीतून त्यांच्या मुलांविषयी नाराजी बोलून दाखविली होती. यामुळे जनसामान्यांत रोषही व्यक्त झाला; मात्र चित्रफितीची दुसरी बाजू जरा वेगळीच आहे.
आजीबार्इंची नाराजी झाल्याने त्यांनी घर सोडले होते. त्या दरमहा, लेखानगरच्या स्टेट बॅँकेत पेंशन घेण्यास त्या जातात त्यानंतर मुलांच्या घरी जाऊन नातवंडांसाठी मायेने खाऊही नेतात, अशी दुसरी बाजू समोर आली आहे.

Web Title: ... the last time I met 'My-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.