दोन महिन्यांत महापालिका लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:56 AM2019-05-29T00:56:23+5:302019-05-29T00:56:45+5:30

महापालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत परिसरातील ८०हून अधिक बेशिस्त नागरिकांवर एप्रिल व मे महिन्यात घनकचरा अधिनियम अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने दोन महिन्यांत पंचवटी महापालिका लखपती झाली आहे.

 In the last two months, municipal corporation lakhpati | दोन महिन्यांत महापालिका लखपती

दोन महिन्यांत महापालिका लखपती

Next

पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत परिसरातील ८०हून अधिक बेशिस्त नागरिकांवर एप्रिल व मे महिन्यात घनकचरा अधिनियम अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने दोन महिन्यांत पंचवटी महापालिका लखपती झाली आहे.
पंचवटी घनकचरा विभागाच्या पथकामार्फत स्वच्छता पाहणीदरम्यान अस्वच्छता कचरा वर्गीकरण न करणारे नागरिक, प्लॅस्टिक कॅरिबॅग वापर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  यामध्ये अस्वच्छता पसरवणाºया ३८ नागरिकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून सुमारे ४३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर प्लॅस्टिकचा वापर व  विक्री करणाºया नऊ जणांकडून ८० किलो प्लॅस्टिक जप्त करत ४५  हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कचरा वर्गीकरण करणाºया दहा नागरिकांकडून पाच हजार रुपये तर रामकुंड परिसरात अस्वच्छता पसरवणाºया ६६ बेशिस्त नागरिकांवर कारवाई करत ६६०० रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय उघड्यावर शौच करणाºया एका व्यक्तीवर कारवाई करून त्याच्याकडून पाचशे रुपये असा एकूण एक लाख १८० रुपयांचा दंड बेशिस्त नागरिकांकडून वसूल केला आहे.
महापालिका उपायुक्त सचिन हिरे, पंचवटी विभाग अधिकारी  राजेंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, दुर्गादास माळेकर, सिद्धार्थ रामवंशी,  रशीद शेख, किरण मारू, दीपक चव्हाण, उदय वसावे, संजय तिडके, विनय रेवर आदींनी ही कारवाई केली आहे.

Web Title:  In the last two months, municipal corporation lakhpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक