वीज बिलांचे उशिरा वाटप; पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:17 AM2019-01-22T01:17:29+5:302019-01-22T01:18:03+5:30
ना रीडिंग, ना वीज बिल पण तीन महिन्यांचे घरगुती व व्यावसायिक वापराचे वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची तंबी देणारा एक कलमी कार्यक्रम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतल्याने आडगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले
आडगाव : ना रीडिंग, ना वीजबिल पण तीन महिन्यांचे घरगुती व व्यावसायिक वापराचे वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची तंबी देणारा एक कलमी कार्यक्रम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतल्याने आडगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. चार महिन्यांपासून वीज बिल मिळत नाही, शिवाय रीडिंग कर्मचाºयांच्या सोयीने घेतले जात असल्यामुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याने नागरिक संतप्त आहेत.
वीज वापराबाबत ग्राहकांना अवगत करण्यासाठी मीटरचा व वापरलेल्या रीडिंगचा फोटो असलेले वीज बिल देण्याची पद्धत ग्राहकांना संभ्रमात टाकत असून, महावितरणद्वारे देण्यात येणाºया बिलांवरील फोटो हे अस्पष्ट असल्याने नागरिकांना नेमके किती वीज वापरले याचा उलगडा होत नसल्याने महावितरणच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. शिवाय काही वीज बिलांचे तर फोटोच काढलेले नसल्याने फोटोची जागा रिक्त असलेले वीज बिल पाठवले जात आहे. महावितरण आपल्या चुका झाकण्यासाठी नवनवीन प्रयोग करत ग्राहकांची लूट करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तीन ते चार महिन्यांपासून वीज बिल नियमित मिळत नाही. शिवाय अंदाजे बिलांमुळे ग्राहकांचा संभ्रम वाढत आहे. आॅनलाइन बिल भरणाºया लोकांना बिल मिळाले नसल्याने किती युनिटचे बिल आहे, याचा अंदाज येत नाही. याबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केली असता थोडे अॅडजेस्ट करून घेण्याचा सल्ला देऊन बिल काढून दिले जात आहे. पण महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. फोटो नसल्यामुळे रीडिंग किती, वीज बिल किती याची माहिती ग्राहकाला मिळत नाही. त्यामुळे एका महिन्याचे बिल कमी येते आणि दुसºया महिन्यात वाढीव युनिटच्या दराने वीज बिल भरावे लागते. शिवाय त्यात सुधारणा करण्यासाठीदेखील ग्राहकांना महावितरण कार्यालय, मुख्य कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. बिल भरले नसल्यास तत्काळ कनेक्शन बंद केले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
कर्मचाºयांच्या सोयीने मीटर रीडिंग
वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देत असल्याने आडगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. चार महिन्यांपासून वीज बिल मिळत नाही, शिवाय रीडिंग कर्मचाºयांच्या सोयीने घेतले जात असल्यामुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.