दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती सटाण्यात वाचन दिवस म्हणून साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 08:45 PM2020-10-15T20:45:25+5:302020-10-16T01:53:12+5:30

सटाणा : येथील पालिकेच्या महात्मा गांधी वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

The late President Dr. Kalam Jayanti celebrated as a reading day in Satna | दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती सटाण्यात वाचन दिवस म्हणून साजरी

सटाणा नगरपरिषदेच्या महात्मा गांधी वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करतांना भारती सुर्यवंशी समवेत विजय देवरे, माणिक वानखेडे, ज्ञानेश्वर खैरनार, मनोज सोनवणे, किशोर सोनवणे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्दे पालकांनी मुलांना चनाची आवड निर्माण केली पाहीजे

सटाणा : येथील पालिकेच्या महात्मा गांधी वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी सनपाच्या उपनगराध्यक्ष भारती सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रशासकीय अधिकारी विजय देवरे म्हणाले प्रत्येकाने वाचन केले पाहीजे. वाचनाने फक्त ज्ञान मिळत नाही तर भाषा देखिल समृद्ध होत असते. आजच्या युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. मोबाईलच्या माध्यमातून ही पुस्तके उपलब्ध झाली आहेत, त्याचा उपयोग पालकांनी मुलांना चनाची आवड निर्माण केली पाहीजे असे मान्यवरांनी मनोगतात सांगितले. यावेळी कार्यालय अधिक्षक माणिक वानखेडे, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार, स्वच्छता निरीक्षक किशोर सोनवणे, मनोज सोनवणे, प्रमोद गहीवड, विनायक पाकळे, पोपट देशमुख, कृष्णा कासार, विवेक देसले आदी उपस्थित होते.
 

Web Title: The late President Dr. Kalam Jayanti celebrated as a reading day in Satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.