खडक माळेगावला पोलिसांकडून लाठीहल्ला
By admin | Published: June 6, 2017 11:05 PM2017-06-06T23:05:41+5:302017-06-06T23:17:23+5:30
शेतकऱ्यांकडून भाजपा सरकारचा, पोलीस प्रशासनाचा टायर जाळून निषेध
निफाड : सातबारा कोरा झाला पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू व्हावा, शेतमालाला हमीभाव मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी खडक माळेगाव येथे शेतकऱ्यांकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना पोलीस प्रशासनाने कशाची माहिती न घेता शेतकऱ्यांच्या जमावावर लाठीहल्ला केला. यात खडक माळेगावचे माजी सरपंच विलास देवरे, ज्ञानेश्वर रायते, बबलू रायते, गोपाल माठा, बाळासाहेब चव्हाण, रमेश रायते या आंदोलकांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्यामुळे त्यांना स्थानिक रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी खडक माळेगाव बंदची हाक देऊन गाव बंद आंदोलन केले. यावेळी पोलीस प्रशासन व भाजप सरकारचा टायर जाळून निषेध करण्यात आला.
याप्रसंगी लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक दत्ता रायते, खडक माळेगावचे सरपंच साहेबराव कान्हे, सोसायटी अध्यक्ष बाबाजी रायते, बाळासाहेब रायते, सुरेश रायते, अरुण शिंदे, यादव रायते, रमेश रायते, राहुल रायते, विकास रायते, पंढरीनाथ रायते, बापू गवळी, नाना शिंदे, विक्र म शिंदे, सोमनाथ रायते, मोतीराम रायते, रावसाहेब रायते, प्रताप राजोळे, प्रमोद भोसले, पंकज पाटील, रामनाथ रायते, अनिल रायते, संतोष रायते, संजय रायते, ज्ञानेश्वर रायते, सोपान रायते, योगेश रायते, संदीप रायते, संतोष रहाणे, हरीश जाधव, योगेश घोडेकर, अशोक पवार, उत्तम शिंदे, अनिल शिंदे, रोहित रायते, किसन रायते, गणेश रायते, महेंद्र रायते, विजय रायते, जयवंत रहाणे, तुकाराम रायते, बंडू रायते, सचिन रायते, राहुल रहाणे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
दरम्यान, खङक माळेगावला संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री सदाभाऊं खोत, जयाजी सूर्यवंशी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांची अंत्ययात्रा काढून दहन केले. याप्रसंगी लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक दत्ता रायते, खडक माळेगावचे सरपंच साहेबराव कान्हे, सोसायटी अध्यक्ष बाबाजी रायते, बाळासाहेब रायते, सुरेश रायते, अरु ण शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ------------------------
वनसगावला प्रतीकात्मक अंत्ययात्रा
टायर जाळून सरकारचा निषेध
निफाड : तालुक्यातील वनसगाव येथील शेतकऱ्यांनी भाजपा सरकारचा निषेध म्हणून वनसगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून व टायर जाळून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी वनसगावचे सरपंच उन्मेष डुंबरे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव शिंदे व संतोष शिंदे, सोसायटी संचालक बाळासाहेब शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, प्रल्हाद डुंबरे, सोमनाथ शिंदे, मंगेश शिंदे, सुभाष शिंदे, प्रकाश जावळे, किरण शिंदे, रामेश्वर पाटील, टी. वाय. शिंदे, एकनाथ शिंदे, केशव शिंदे, सुनील मापारी, डॉ. योगेश डुंबरे, मनेष शिंदे, राहुल डुंबरे, अशोक शिंदे, जगन आहेर, संजय तोङकर, नंदू शिंदे, प्रकाश शिंदे, दत्तू शिंदे, नवनाथ जाधव, पुंडलिक शिंदे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------