शौचालय न बांधता लाटले अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:40 AM2019-07-05T00:40:52+5:302019-07-05T00:43:53+5:30
सटाणा : सुमारे दहा लाखांचे अनुदान हडपसटाणा : येथील पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालयांपैकी ५८ लाभार्थींनी शौचालय न बांधता साडेनऊ लाख रु पयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराला पालिका प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.

येथील पालिका कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने ८०७ वैयक्तिक शौचालयांना मंजुरी दिली होती. या शौचालयांना शासनाकडून प्रत्येकी १२ हजार व पालिकेकडून ५ हजार रु पये अनुदान मंजूर करण्यात आले होते. पालिका प्रशासनाने मंजूर केलेल्या शौचालयांपैकी ७१० शौचालयांची बांधकामे पूर्ण करून ती वापरात आली. तर ३६ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असताना उर्वरित ५८ लाभार्थींनी मात्र शासकीय अनुदान घेऊनही बांधकामेच केली नसल्याचे उघडकीस आले आहे. तब्ब्ल ९ लाख ८६ हजार रु पयांचे अनुदान लाटले असल्याचे समोर आले आहे.
याला पालिका प्रशासनाने दुजोरा दिला असून, संबंधित लाभार्थींना वेळोवेळी सूचना व नोटिसा देऊनही बांधकामे केली नसल्याचे बोलले जात आहे.ज्या लाभार्थींनी शौचालय बांधकामासाठी अनुदान अदा करूनही बांधकामे केली नाहीत, अशा लाभार्थींनी तत्काळ अनुदान परत करावे अन्यथा त्यांच्या विरु द्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
- हेमलता डगळे, मुख्याधिकारी, सटाणा पालिका