वाराणसीतील लाठीमार दुर्दैवी
By admin | Published: September 26, 2015 09:57 PM2015-09-26T21:57:37+5:302015-09-26T21:58:05+5:30
त्र्यंबकेश्वर : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
त्र्यंबकेश्वर : उत्तर प्रदेश सरकारने वाराणसी येथे गणेश विसर्जनाच्या प्रसंगी केलेला लाठीमार दुर्दैवी असून, हिंदू धर्माच्या परंपरांना हे शासन हेतुपुरस्सर दबावतंत्र वापरून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असे उद्गार ज्योतिष आणि शारदा मठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी काढले.
त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यानिमित्त वास्तव्यास असलेले स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे वाराणसी येथे गणेश विसर्जनाच्या बाबत झालेल्या प्रकाराने व्यथित झाले आहेत. वाराणसी येथे गणेशमूर्ती विसर्जन नदीघाटावर करण्यासाठी अखिलेश यादव सरकारने प्रतिबंधक केला असता तेथे दोन दिवस गणेशभक्त थांबून राहिले असता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये गंगा प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती विसर्जन रोखणारे शासन कारखान्यांमधून आणि निवासी वस्त्यांमधून वाहणारे पाणी गंगेत जाण्यापासून रोखण्यास अयशस्वी ठरले आहे. कोट्यावधी रुपयांचे बजेट यासाठी केले असता त्यास यश येत नाही मात्र हिंदूच्या गणेशमूर्ती अथवा अन्य सणांच्या बाबत गंगा प्रदूषण होते म्हणून बंदी घालणारे शासन काही हेतू मनात ठेवून हे करत आहे. (वार्ताहर)