लोणारवाडी येथे बोहडा उत्सवास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:37 PM2019-04-08T17:37:17+5:302019-04-08T17:37:59+5:30
सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी (शास्त्रीनगर) येथे पारंपरिक आखाडी (बोहाडा) उत्सवास रविवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या लोणारवाडीत गेल्या अनेक वर्षांपासून बोहड्याची परंपरा जोपासली जात आहे.
सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी (शास्त्रीनगर) येथे पारंपरिक आखाडी (बोहाडा) उत्सवास रविवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या लोणारवाडीत गेल्या अनेक वर्षांपासून बोहड्याची परंपरा जोपासली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून आखाडी म्हणजेच बोहडा हा उत्सव साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारा हा उत्सव ७ एप्रिल ते ११ एप्रिलपर्यंत पाच दिवस चालणार असून, यात धार्मिक व सांस्कृतिक परंपरेनुसार विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
गावातील मुख्य चौकात बोहडा आखाडीचा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक दिवशी रात्री ८ वाजता पुराणातील पात्रांची मिरवणूक काढली जाणार आहे. यात दररोज स्कंदपुराणातील, विष्णुपुराणातील पात्रांची वेशभूषा करून पौराणिक आख्यायिका सादर केली जाते. सारज-गणपती, देवी, चंद्रसूर्य, शंकर-पार्वती, मोहिनी, भस्मासुर, देवी-देवतांची पात्रे, रामायण, महाभारतातील कथा, ग्रामदैवत खंडेराव, भैरवनाथ यांसारख्या ग्रामदैवतांची वेशभूषा असलेली पात्रे सनई-वाद्यांच्या तालावर नाचवले जातात. या सर्व पात्रांची आख्यायिका शाहिरी गाण्यांतून शाहीर रंगनाथ भाटजिरे सादर करतात. चार दिवस चालणाऱ्या या उत्सावास ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते.
फोटो क्र.- 08२्रल्लस्रँ03
फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथे चार दिवस चालणाºया बोहाडी उत्सवात पौराणिक आख्यायिकेतील विविध पात्रे सादर करताना ग्रामस्थ.