रेल्वेस्थानकात बॉटल क्र शिंग मशीनचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:46 PM2019-09-24T23:46:58+5:302019-09-25T00:41:49+5:30
रोटरी क्लब नाशिक वेस्टच्या मदतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीनचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे.
नाशिकरोड : रोटरी क्लब नाशिक वेस्टच्या मदतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीनचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी एनक्लेव्हचे अध्यक्ष गुरुमित सिंग, रोटरी वेस्टचे अध्यक्ष केशव पै, सचिव मनीषा विसपुते, सीमा पछाडे, दीपा चांगरिया, जीवनजीत चौधरी, किशोर केडिया, राजीव शर्मा, गुरुमित सिंग, सुरेश शिंदे, स्टेशनमास्तर आर. के. कुठार, मुख्य आरोग्य निरीक्षक अमोल सहाणे, नाशिकरोडचे मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, राकेश पलारिया, जीवन चौधरी, अनिल गोयल, आशा वेणुगोपाल, राहुल औटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्लॅटफार्म क्र मांक दोनवर हे मशीन बसविले आहे. या प्लॅटफार्मला जोडूनच तिसरा प्लॅटफार्म असल्याने जास्तीत जास्त प्रवासी त्याचा वापर करतील.
नाशिकरोडला गेल्या आठवड्यात असे एक मशीन रेल्वेने बसविले आहे. रोटरीचे सदस्य सुरेश शिंदे यांनी त्यांच्या अंबडच्या कारखान्यात प्लॅस्टिक बॉटल क्र श करण्याची आधुनिक मशीन तयार केली आहे. रेल्वे प्रवाशांनी पाण्याची बाटली कचरापेटी किंवा इतरत्र फेकू नये. ती मशीनमध्ये टाकल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही.