सोमवारपासून चालिहा व्रतास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:14 PM2019-07-19T23:14:19+5:302019-07-20T00:09:17+5:30
सिंधी समाजामध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या चालिहा या धार्मिक व्रताला सोमवार, दि.२२ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या व्रताच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वर्किंग कमिटीचे अध्यक्ष आनंद कुकरेजा व ट्रस्टचे अध्यक्ष वासुदेव श्रॉफ यांनी दिली आहे.
देवळाली कॅम्प : सिंधी समाजामध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या चालिहा या धार्मिक व्रताला सोमवार, दि.२२ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या व्रताच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वर्किंग कमिटीचे अध्यक्ष आनंद कुकरेजा व ट्रस्टचे अध्यक्ष वासुदेव श्रॉफ यांनी दिली आहे.
देवळालीच्या झुलेलाल मंदिरात पूज्य दर्याशाह संगत ट्रस्टच्या वतीने सोमवारी सकाळी अखंड ज्योतीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिराचे वर्किंग कमिटीचे सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बहेराणा पूजन (ज्योतपूजन) करून व्रतारंभ होणार आहे. व्रत करणाऱ्या भाविकांच्या हाती घनशाम महाराज शर्मा यांच्या हस्ते व्रतस्थ राहण्याचा संकल्प करवून घेतला जाईल. तसेच दररोज सांयकाळी अक्खा पूजन करण्यात येणार आहे. सकाळी व सायंकाळी आरती करण्यात येईल. शुक्रवार, दि. २ आॅगस्ट रोजी चंद्रदर्शन असल्याने भजन व भंडाºयाचे आयोजन केले जाणार आहे. नऊ दिवसाचे व्रत करणाºया भाविकांना हे व्रत करता येईल.
श्रीकृष्ण जन्मानिमित्त रात्री भजन व प्रसाद वाटप व दि. २६ आॅगस्ट रोजी मोहन सचदेव यांची भजनसंध्या होईल. शनिवार, दि. ३१ आॅगस्ट रोजी व्रताच्या चाळिसाव्या दिवशी विधिवत मटकी पूजन करून विशेष महत्त्व असलेले अक्खा पूजन व घड्याची मिरवणूक संसरी येथील दारणा नदीतटापर्यंत मिरवणूक काढली जाईल.