‘चितळे एक्सप्रेस’चा नाशिकमध्ये प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:17 AM2021-02-16T04:17:07+5:302021-02-16T04:17:07+5:30

नाशिक : तब्बल ८१ वर्षांपासून नात्यातील गोडवा जपणाऱ्या चितळे बंधू यांच्या ‘चितळे एक्सप्रेस’ या आऊटलेटचे नाशिकमध्ये पदार्पण झाले आहे. ...

Launch of 'Chitale Express' in Nashik | ‘चितळे एक्सप्रेस’चा नाशिकमध्ये प्रारंभ

‘चितळे एक्सप्रेस’चा नाशिकमध्ये प्रारंभ

Next

नाशिक : तब्बल ८१ वर्षांपासून नात्यातील गोडवा जपणाऱ्या चितळे बंधू यांच्या ‘चितळे एक्सप्रेस’ या आऊटलेटचे नाशिकमध्ये पदार्पण झाले आहे. डोंगरे वसतीगृह मैदानासमोरील सुयोजित अवधूत टॉवर येथील दालनात चितळे यांची सर्व उत्पादने एकाच छताखाली आता नाशिककरांना मिळू शकणार आहेत. चितळे एक्स्प्रेसच्या उद्घाटनप्रसंगी प्रख्यात कलाकार मंगेश कदम व लीना भागवत, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे व केदार चितळे, ज्येष्ठ विधिज्ञ सुशील अत्रे, मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, अरविंद कोरान्ने व अमोद एन्टरप्रायझेसचे मिलिंद कोरान्ने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी चितळे एक्सप्रेसच्या नाशिकमधील आगमनामुळे खवय्ये व रसिक नाशिककर सुखावले असल्याचे नमूद केले.

इन्फो

राज्यातील अठरावे दालन

चितळे एक्सप्रेसचे हे महाराष्ट्रातील १८ वे दालन असल्याचे गिरीश चितळे यांनी सांगितले. त्यामध्ये चितळेंची सर्व उत्पादने जसे- बाकरवडी, श्रीखंड, पेढे, दही, तूप, इन्स्टन्ट उत्पादने, गुलाबजाम, स्नॅक्स व नमकीन, ज्युसेस व लस्सी तसेच अनेक नवीन उत्पादने उपलब्ध राहणार आहेत. नवीन दालने वाढवताना अधिकाधिक शेल्फ लाईफ असलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

इन्फो

अभिनव पद्धतीची उत्पादने

अस्सल मराठी खाद्यपदार्थांनाच चितळेमध्ये प्राधान्य दिले जाते, असे केदार चितळे यांनी सांगितले . तसेच एकूण उत्पादनांपैकी बहुतांश उत्पादने मशीनवरच हस्तस्पर्शाविना तयार आणि पॅक होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घेतली जाते. पुरणपोळीसारखे उत्पादन महिनाभर ताजे राहणे शक्य व्हावे, यासाठी पेटंट असलेल्या मॉडीफाईड ॲटमोसफेरीक पॅकेजिंग केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

फोटो (१५चितळे )

चितळे एक्सप्रेसचे उद्घाटन करताना गिरीश चितळे आणि केदार चितळे. समवेत प्रख्यात कलाकार लीना भागवत, मंगेश कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी.

Web Title: Launch of 'Chitale Express' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.