कोरोनामुक्त गाव अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:11 AM2021-06-19T04:11:11+5:302021-06-19T04:11:11+5:30
या उपक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षण कार्याची सुरुवात केली. तसेच ...
या उपक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षण कार्याची सुरुवात केली. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहितीपत्र वाटपाद्वारे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे, कोणालाही कोरोनासदृश लक्षणे असल्यास चाचणी करण्यास सांगणे, सर्वांनी लस घेणे आवश्यक असल्याचे सांगून जनजागृती करण्यात आली. लस नोंदणी, लसीचे फायदे यासंदर्भात गावकऱ्यांचे प्रबोधन केले. या अभियानास संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, अजितकुमार सुराणा, समन्वयक नंदकिशोर ब्रम्हेचा, डॉ. सुनीलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा, सरपंच संजय पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे घरोघरी वाटप करण्यात आले. त्यावेळी कोरोनासाठी त्रिसूत्रीचे पालन म्हणजेच प्रतिबंध असा संदेश प्राचार्य डॉ. अजय दहाड यांनी दिला.
या अभियानात डॉ. पारीक, डॉ. त्रिपाठी, डॉ. अमित जगताप व अधिकारी, कम्युनिटी मेडिसिन विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
फोटो - १८एमएमजी ३
उसवाड येथे कोरोनामुक्त गाव अभियानात सहभागी झालेले डॉक्टर व स्वयंसेवक.
===Photopath===
180621\18nsk_35_18062021_13.jpg
===Caption===
उसवाड येथे कोरोना मुक्त गाव अभियानात सहभागी झालेले डॉक्टर व स्वयंसेवक.