कळवण शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:33 PM2020-07-18T20:33:05+5:302020-07-19T01:00:43+5:30

कळवण : कोरोनाचे ११ रु ग्ण आढळून आल्याने कळवण नगरपंचायत हद्दीअंतर्गत शहरात घरोघरी जाऊन आर. के. एम माध्यमिक विद्यालय, जानकाई विद्यालय, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह स्थानिक डॉक्टर, नगरपंचायत कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांकडून शनिवारी (दि.१८) घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यास सुरु वात झाली.

Launch of door-to-door survey campaign in Kalvan city | कळवण शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीमेस प्रारंभ

कळवण शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीमेस प्रारंभ

Next

कळवण : कोरोनाचे ११ रु ग्ण आढळून आल्याने कळवण नगरपंचायत हद्दीअंतर्गत शहरात घरोघरी जाऊन आर. के. एम माध्यमिक विद्यालय, जानकाई विद्यालय, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह स्थानिक डॉक्टर, नगरपंचायत कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांकडून शनिवारी (दि.१८) घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यास सुरु वात झाली.
कळवण शहरात खबरदारीचा उपाय म्हणून आमदार नितीन पवार, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांनी शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाची बैठक घेऊन शहर अंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करण्याची सूचना केली होती. सर्वेक्षण करणाºया यंत्रणेला नगरपंचायतकडून संरक्षण साहित्य, तपासणी साहित्य व साधन सामुग्री देण्यात आली. त्यानुसार ५० कर्मचाऱ्यांमार्फत रु ग्णांचे सर्वेक्षण करण्यास सुरु वात करण्यात आली.
शहरातील नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन कळवणच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी महाले गटनेते कौतिक पगार, उपनगराध्यक्ष अतुल पगार यांनी केले आहे. आरोग्य सर्वेक्षणत कुटुंबातील कोणी रु ग्ण आढळल्यास त्याची नोंद आरोग्य विभागाकडे केली जाणार आहे. तसेच या रु ग्णांची तपासणी करून त्यांच्या सर्दी,खोकला याची तीव्रता बघून त्याला औषधे दिली जाणार आहेत.
------------------
सहा दिवस जनता कर्फ्यू
कळवण शहरात गेल्या शुक्र वारपासून ६ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कळवण शहरातील सर्व व्यवहार ६ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधी चौक, मेनरोड परिसरातील भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाले असून तेथील रहिवाशांना बाहेर निघण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. संपूर्ण शहरात नगरपंचायतचे औषध फवारणी करण्याचे नियोजन असून घरोघरी आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे . दरम्यान, घरोघर जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी कळवण नगरपंचायतीच्या कर्मचाºयांची सतरा प्रभागात सतरा पथके तयार केली असून, पुढील सात दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण होईल असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Launch of door-to-door survey campaign in Kalvan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक