एक हजार शाळांमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’चे प्रक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:30 AM2019-01-30T01:30:00+5:302019-01-30T01:30:21+5:30
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून ‘परीक्षा पे चर्चा’ करीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे देशातील काही निवडक ...
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून ‘परीक्षा पे चर्चा’ करीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे देशातील काही निवडक विद्यार्थ्यांशी मंगळवारी (दि.२९) संवाद साधला. या कार्यक्रमाचे दूरचित्रवाहिनी, आकाशवाणी, इंटरनेट आणि प्रोजेक्टरसाख्या विविध माध्यमांतून जिल्ह्यातील १ हजार २० शाळांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले, तर काही शाळांमध्ये तांत्रिक कारणांनी प्रक्षेपण होऊ शकले नाही, तर काही शाळांची माहिती उपलब्ध होऊ शकली नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सांगितले.
दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना या परीक्षांचा विद्यार्थ्यांच्या मनावर येणारा तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी केलेल्या सूचनांचा नाशिकमधील विद्यार्थ्यांनी ऐकल्या असून, त्याचा परीक्षेत विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल? असा विश्वास विविध शाळांच्या शिक्षकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे जिल्ह्यातील सुमारे १ हजार २० शाळांमध्ये प्रेक्षपण झाले, तर जवळपास ८० शाळांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण होऊ शकले नाही.