‘गुरपूरब’ सोहळ्याचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:44 PM2020-01-10T23:44:20+5:302020-01-11T01:25:31+5:30
गुरू गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त गुरू गोविंदसिंग फाउंडेशनच्या स्थापना दिवसानिमित्त येथील खालसा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये ‘गुरपूरब’ या तीन दिवस सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्य समाजाचे विचारवंत व लेखक दौलत राय यांच्या नजरेतून ‘साहिबे कमाल गुरू गोविंदसिंग’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
इंदिरानगर : गुरू गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त गुरू गोविंदसिंग फाउंडेशनच्या स्थापना दिवसानिमित्त येथील खालसा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये ‘गुरपूरब’ या तीन दिवस सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्य समाजाचे विचारवंत व लेखक दौलत राय यांच्या नजरेतून ‘साहिबे कमाल गुरू गोविंदसिंग’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
व्यासपीठावर गुरूगोविंदसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष गुरदेवसिंग बिर्दी, उपाध्यक्ष हरजितसिंग आनंद, सचिव बलबीरसिंग छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदरसिंग उपस्थित होते.
गुरू गोविंदसिंग फाउंडेशनचे सहसचिव सरदार हरबंससिंग घटौडे यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य सुभाष भावसार यांनी या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केला. पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील गुरु कुल प्रतिष्ठान आणि श्री संत नामदेव अध्यासनाचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ अभियंता दिलीप क्षीरसागर, प्राचार्य सुभाष भावसार, ग्यानी बलविंदरसिंग, गुरूगोविंदसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार गुरदेवसिंग बिर्दी यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन तेजश्री कुलकर्णी यांनी केले. रणजित सिंग आनंद यांनी आभार मानले. दरम्यान, गुरु गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त शनिवारी (दि. ११) अखंड नामस्मरण, व्याख्यान, विविध स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत, तर रविवारी (दि. १२) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा संवर्धन सप्ताह सफल
डॉ. अशोक कामत यावेळी म्हणाले, मराठी भाषा संवर्धन सप्ताह सुरू असताना जेव्हा गुरू गोविंदसिंग फाउंडेशनसारख्या शैक्षणिक संस्थेमध्ये मराठी पुस्तकाचे प्रकाशन होते तेव्हा तो सप्ताह सफल झाल्यासारखे वाटते. गुरु ग्रंथ साहिबमध्ये भारतातल्या सर्व संतांची वाणी समाविष्ट आहे. यात सात्विकता, धार्मिकता आहे जी भारताच्या सर्व समाजविकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.