‘हायवे मृत्युंजय दूत’ उपक्रमाचा घोटीत शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:49+5:302021-03-04T04:24:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इगतपुरी : महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ हा ...

Launch of 'Highway Mrityunjay Doot' initiative | ‘हायवे मृत्युंजय दूत’ उपक्रमाचा घोटीत शुभारंभ

‘हायवे मृत्युंजय दूत’ उपक्रमाचा घोटीत शुभारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इगतपुरी : महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महामार्गाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून १ मार्चपासून या उपक्रमाला महामार्ग घोटी पोलीस केंद्रावर शहापूरचे आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अध्यक्ष श्याम धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आली.

देशात महामार्गांवरील रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. नेमकी हीच बाब ओळखून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. येथील विद्यार्थी, सेवाभावी नागरिक यांना सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर डगळे यांनी प्रशिक्षण दिले.

यावेळी सेवानिवृत्त भारतीय सीमा सुरक्षा बलाचे एल.के. शर्मा, माजी नौदल प्रमुख हरीश चौबे, सुरक्षा अधिकारी जयंत इंगळे, कैलास ढोकने, सहायक उपनिरीक्षक माधव पवार, दिनकर बांडे, हवालदार संजय क्षीरसागर, राहुल गांगुर्डे, केतन कापसे, जितेंद्र वितकर, राहुल सहाणे, जितेंद्र पाटोळे आदी उपस्थित होते.

फोटो- ०१ मृत्युंजय ग्रुप

‘ हायवे मृत्युंजय दूत’ या उपक्रमाचे फीत कापून उद्घाटन करताना आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष श्याम धुमाळ यांसह उपस्थित मान्यवर.

===Photopath===

010321\485501nsk_27_01032021_13.jpg

===Caption===

 फोटो- ०१ मृत्यूंजय ‘ हायवे मृत्युंजय दूत’ या उपक्रमाचे फीत कापून उद्घाटन करतांना आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष शाम धुमाळ यांसह उपस्थित मान्यवर. 

Web Title: Launch of 'Highway Mrityunjay Doot' initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.