औद्योगिक भूखंड नोंदणीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:06 AM2019-06-15T01:06:40+5:302019-06-15T01:07:14+5:30

मालेगाव तालुक्यातील अजंग-रावळगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवर औद्योगिक वसाहतीचे फलक अनावरण व भूखंड नोंदणीचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

Launch of industrial plot registration | औद्योगिक भूखंड नोंदणीचा शुभारंभ

मालेगाव तालुक्यातील अजंग-रावळगाव एमआयडीसीच्या भूखंड नाव नोंदणीचे कुदळ मारुन शुभारंभ करताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई. समवेत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, बंडूकाका बच्छाव, राजेंद्र जाधव, सुनील गायकवाड आदिंसह पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देमालेगावी उद्योजक परिषद : राज्यभरातील उद्योजकांना सुभाष देसाई यांचे आवाहन

मालेगाव : तालुक्यातील अजंग-रावळगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवर औद्योगिक वसाहतीचे फलक अनावरण व भूखंड नोंदणीचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर आयोजित केलेल्या उद्योजक परिषदेत उद्योगमंत्री देसाई म्हणाले, अजंग-रावळगाव एमआयडीसीत वस्त्रोद्योगासाठी मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. ३०० जणांनी भूखंडासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. राज्यभरातील उद्योजकांना मालेगावी उद्योग टाकण्यासाठी शिफारस केली जाईल. कापूस तेथे वस्त्रोद्योग हे शासनाचे धोरण आहे. कापूस उत्पादक प्रदेशात अमरावतीनंतर मालेगावी औद्योगिक वसाहत उभारली जात आहे. ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी चांगला पाठपुरावा केला. तसेच त्यांनी एमआयडीसीसाठी चणकापूर व पूनद धरणातून पाण्याचे आरक्षण केले आहे. जमीन सपाटीकरण केले जात आहे. रस्ते, वीज आदि कामे मार्गी लावली जातील. डी प्लस झोनचा दर्जा असल्यामुळे इतर ठिकाणांपेक्षा मालेगावच्या एमआयडीसीत दोन रूपये प्रति युनिट वीज दर कमी आहे. शासन उद्योजकांसाठी वीज दर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे असेही देसाई यांनी सांगितले.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले की, शेती उद्योग जेवढा महत्वाचा आहे तेवढाच औद्योगिक उद्योगही महत्वाचा आहे. शेती उद्योगावर दुष्काळ व इतर संकटे येत आहेत. या पार्श्वभूमीवर तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक वसाहत सुरू करण्यात आली आहे. ४० गाव फाट्यावरील औद्योगिक वसाहतीला उद्योजकांनी प्रतिसाद दिला नाही. झोडगे परिसरातही शेतकऱ्यांनी विरोध केला. एमआयडीसीसाठी जागेचा शोध घेत असताना शासनाच्या हक्काची अजंग व रावळगाव येथील शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध झाली आहे.
व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, मालेगाव मध्यचे आमदार आसीफ शेख, महापौर रशीद शेख, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्छाव, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, प्रदीप पेशकर, महाराष्टÑ चेंबर्सचे संतोष मंडलेचा आदिंसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्छाव, उद्योजकांचे प्रतिनिधी म्हणून ममता लोढा, अलिम फैजी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील आदिंची भाषणे झाली.
उद्योग परिषदेला भाजपाचे गटनेते सुनील गायकवाड, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, तालुका प्रमुख संजय दुसाने, महानगर प्रमुख रामा मिस्तरी, शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाध्यक्ष निलेश कचवे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल, भरत देवरे, नंदकिशोर मोरे, रवीश मारू, भाजपाचे प्रांतिक सदस्य नितीन पोफळे, विवेक वारूळे, अनिल पवार आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते, राज्यभरातील उद्योजक, तालुक्यातील पदाधिकारी आदि उपस्थित
होते. सूत्रसंचालन पेठकर यांनी केले तर आभार शशिकांत निकम यांनी मानले.

Web Title: Launch of industrial plot registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.