आंतरराष्टय बुद्धिस्ट परिषदेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:09 AM2019-02-25T01:09:34+5:302019-02-25T01:10:22+5:30
सुमेध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुद्धस्मारक येथे आंतरराष्टÑीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन लामा खेंसुर रिम्पोचे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीलंकेचे भन्ते सिवली महाथेरो उपस्थित होते.
नाशिक : सुमेध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुद्धस्मारक येथे आंतरराष्टÑीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन लामा खेंसुर रिम्पोचे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीलंकेचे भन्ते सिवली महाथेरो उपस्थित होते.
बुद्ध लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धस्मारक परिसराच्या आवारात या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, परिषदेत बुद्धलेण्याविषयी देश-विदेशांत प्रचार आणि प्रसार करणे यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक भिक्खू राहुल थेरो यांनी बौद्धधम्मावर विवेचन केले. याप्रसंगी भन्ते धम्मरक्षित, भन्ते आर्यनाग, भन्ते पुण्यश्री, भन्ते अज्यपाल, भन्ते गुणानंद, भन्ते शीलबोधी आदिंसह म्यानमार, थायलंड येथील भन्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भन्ते संघरत्न, भन्ते धम्म यांनी केले होते.