जितो नाशिक ऑक्सिजन बँकेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:21+5:302021-05-23T04:14:21+5:30
लॉकडाऊनची परिस्थिती आणि सरकारी नियमांना अनुसरून अल्प उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. जितो नाशिक चाप्टर कोविड-१९ च्या संकटावर ग्रुपतर्फे आतापर्यंत ...
लॉकडाऊनची परिस्थिती आणि सरकारी नियमांना अनुसरून अल्प उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. जितो नाशिक चाप्टर कोविड-१९ च्या संकटावर ग्रुपतर्फे आतापर्यंत केलेल्या संक्षिप्त स्वरूपात माहिती मुख्य सेक्रेटरी कमलेश कोठारी यांनी दिली. ऑक्सिजन बँक कोणत्या प्रकारे कार्य करणार याची माहिती या प्रोजेक्टचे प्रमुख कौस्तुभ मेहता यांनी दिली. कोविड -१९ ची आतापर्यंतची स्थिती आणि येणाऱ्या वेळेत कोणत्या उपाययोजना करायला हव्या या बाबतीत डॉ. मनोज चोपडा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. स्वप्नील साखला व डॉ. श्रेणीक गुगळे यांना जितो नाशिक चाप्टरमध्ये पेट्रोन सदस्य झाल्यावर पिन प्रदान पूर्व अध्यक्ष वर्धमान लुंकड व पंकज पाटणी तसेच सुनील जैन आणि अतुल जैन यांनी केले. दोन्ही डॉक्टरांनी आपली सेवा समाजाला देण्यासाठी व ग्रुपमध्ये सदस्य झाल्याने आपला आनंद जाहीर केला आणि आपले वक्तव्य प्रकट केले. जितो कोविड सेंटर एमराल्ड पार्क या तारांकित हॉटेलमध्ये चालविण्यात आला होता. या आयोजनात ग्रुपला केलेल्या सहकार्यासाठी हॉटेल संचालक तेज टकले यांचा सत्कार जितो चेअरमन पारस साखला व जितो माजी चेअरमन शांतीलाल बाफना तथा सतीश हिरण यांच्या हस्ते करण्यात आला. जितो आर.ओ. एम.(रोम) व्हा. चेअरमन सतीश हिरण यांनी कोविड-१९ संकटाबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मुथा यांनी केले, तसेच हेमंत दुगड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. वैभव गुळेचा, योगेश कटारिया, संदीप लुंकड, अतुल बोहरा हे उपस्थित होते. हा उपक्रम सर्वांसाठी दि.१९ मे २०२१ पासून सुरू झाला असून अधिक माहितीसाठी जितो नाशिक चाप्टर ग्राउंड फ्लोअर, बिजनेस बे, संदीप हॉटेल रोड ,मुंबई नाका येथे किंवा २९५८०५०, ९५०४०८००९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो
उपाययोजनांची चर्चा
या संकटात आपल्याला अजून कोणत्या उपाययोजना करायला हव्या याची माहिती अपेक्स डायरेक्टर मिलिंद शहा यांनी दिली. नरेंद्र गोलिया यांनी समयोचित भाष्य करताना ऑक्सिजन प्लांटचे महत्त्व आणि गरज याबद्दल आवाहन केले. ग्रुपकडून व्हॅक्सिनेशनसाठी आगामी वेळेत कार्य करण्यात येणार आहे. त्याबद्दल दिनेश धोका यांनी माहिती दिली.