कादवाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
By admin | Published: November 3, 2015 10:02 PM2015-11-03T22:02:38+5:302015-11-03T22:03:11+5:30
कादवाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ३९व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाला. यावेळी कादवाचा हमीभाव (एफआरपी) अनेक नामवंत कारखान्यांपेक्षा अधिक राहिला असून, अडचणीच्या काळातही जास्तीत जास्त एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना देण्याचा प्रयत्न कारखान्याचा असून, यंदाही कादवा शेतकऱ्यांना जास्त भाव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना ऊसतोडणीसाठी घाई न करता परिपक्व ऊस गाळपासाठी द्यावा व आगामी काळात विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्पासाठी जास्तीत जास्त ऊस लावण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कादवाने या गळीत हंगामाचा शुभारंभ साधेपणाने करण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय असल्याचे झिरवाळ यावेळी म्हणाले.
यावेळी एकनाथ बर्डे, सुधीर पाटील, दिलीप शिंदे, विश्वनाथ देशमुख, छगनसिंह परदेशी यांनी सपत्निक गव्हाणपूजन करण्यात आले. प्रास्ताविक माजी आमदार तथा कादवाचे उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव यांनी तर सूत्रसंचलन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले. (वार्ताहर)