हरणबारीतून खावटी वाटपाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:31+5:302021-07-11T04:11:31+5:30

कार्यक्रमात आमदार बोरसे, प्रकल्प अधिकारी विकास मीना, समन्वयक पंकज बुरकुले, संपर्क अधिकारी डी. डी. मोरे, विस्तार अधिकारी आर. आर. ...

Launch of Khawati distribution from Haranbari | हरणबारीतून खावटी वाटपाचा शुभारंभ

हरणबारीतून खावटी वाटपाचा शुभारंभ

Next

कार्यक्रमात आमदार बोरसे, प्रकल्प अधिकारी विकास मीना, समन्वयक पंकज बुरकुले, संपर्क अधिकारी डी. डी. मोरे, विस्तार अधिकारी आर. आर. तोरणे, सरपंच पोपट ठाकरे, उपसरपंच विलास नंदन यांच्या हस्ते लाभार्थींना १९ किलो खाद्यपदार्थ व कळवण प्रकल्पांतर्गत ७० हजार ८१ लाभार्थींच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये वर्ग करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोरसे यांनी सांगितले की, खावटी योजनेंतर्गत आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जातीचे दाखले व इतर योजनांचा लाभ मिळाला नसून, हजारो आदिवासी बांधवांनी अजूनही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. याबाबत आरोग्य विभागाशी समन्वय साधून पुन्हा या विभागाने जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती त्यांनी केली. प्रकल्प अधिकारी मीना यांनी सांगितले की, खावटी वाटप योजनेचा जिल्ह्यातील हा पहिला कार्यक्रम असून, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. मुख्याध्यापक आर. आर. कापडणीस, एच. डी. जाधव यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी उद्धव अहिरे, दिलीप जाधव, बी. एस. देवरे, के. पी. नेरकर, बी. एच. कापडणीस, नंदलाल ठाकरे, राजेंद्र साळवे, डॉ. पंकज चव्हाण, डी. बी. कापडणीस , एस. एस. देवरे, व्ही. डी. देवरे, एस. बी. पवार, दीपक देशमुख, संदीप शेवाळे उपस्थित होते. हरणबारी शाळेसाठी प्रगतिशील शेतकरी उद्धव अहिरे यांनी विहिरीसाठी स्वतःची जागा दिल्याबद्दल तसेच आदर्शवत काम करणारे अधीक्षक राजेंद्र सावळे यांचा आमदार बोरसे व प्रकल्प अधिकारी मीना यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

कोट...

देव्हाऱ्यातील देवाची पूजा न करता आम्ही शिधापत्रिका व जातीच्या दाखल्यांची देव मानून पूजा करीत आहोत . त्यामुळे मूळ आदिवासींच्या हक्काच्या योजनांचा लाभ त्यांना प्राधान्याने द्यावा. जेणेकरून आदिवासींचा खऱ्या अर्थाने विकास होईल.

- दिलीप बोरसे, आमदार

फोटो - १० सटाणा खावटी

हरणबारी येथे आदिवासी विकास विभागांतर्गत लाभार्थींना खावटी वाटप करताना आमदार दिलीप बोरसे, प्रकल्प अधिकारी विकास मीना, पंकज बुरकुले, टी. डी. मोरे, आर. आर. तोरणे, आर. आर. कापडणीस, राजेंद्र साळवे, दिलीप जाधव.

100721\10nsk_30_10072021_13.jpg

हरणबारी येथे आदिवासी विकास विभागांतर्गत लाभार्थ्यांना खावटी वाटप करताना आमदार दिलीप बोरसे, प्रकल्प अधिकारी विकास मीना, पंकज बुरकुले , टी . डी . मोरे , आर . आर . तोरणे , आर . आर . कापडणीस , राजेंद्र साळवे , दिलीप जाधव.

Web Title: Launch of Khawati distribution from Haranbari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.