महापालिका प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:46+5:302021-03-21T04:14:46+5:30

नगरसेविका ज्योती खोले, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे व कोमल मेहरोलीया यांनी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. वृत्तपत्र ...

Launch of Kovid vaccination at Municipal Primary Health Care Center | महापालिका प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ

महापालिका प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ

googlenewsNext

नगरसेविका ज्योती खोले, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे व कोमल मेहरोलीया यांनी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी अध्यक्ष सुनील मगर यांना प्रथम लस देण्यात आली. डॉ. शुभम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका रुपाली सदावर्ते, सुनिता मोसे, मार्गरेट शिंदे, उज्वला कातकाडे, सपना ढेरे, किशोर मोराडे, शोभा मिलिंदमणी, निलेश देवगिरे लसीकरणाचे काम करत आहेत. या केंद्रात रोज २०० नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असून जेष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सुरू झाल्यामुळे बिटको कोविड सेंटरवरील भार काही प्रमाणात कमी झाला आहे. खोले मळा, आनंद नगर, भालेराव मळा, फर्नाडिस वाडी, जेतवन नगर, देवळालीगाव, हरीओम नगर, सुंदरनगर, रोकडोबा वाडी, डोबीमळा अर्टीलरी सेंटररोड या भागातील नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. यावेळी सुरभी सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शाम खोले, किरण देशमुख, संतोष बडगे, दिपक लवटे आदी उपस्थितीत होते.

===Photopath===

200321\20nsk_30_20032021_13.jpg

===Caption===

महापालिका प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ

Web Title: Launch of Kovid vaccination at Municipal Primary Health Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.