बागलाणमध्ये कुष्ठरोग, क्षयरोग शोधमोहिमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:27+5:302020-12-06T04:15:27+5:30
कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत आहेरराव , डॉ. संजीवनी क्षीरसागर, प्रदीप बच्छाव, आरोग्य सहायक किरण शेवाळे, पंकज गायकवाड, ...
कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत आहेरराव , डॉ. संजीवनी क्षीरसागर, प्रदीप बच्छाव, आरोग्य सहायक किरण शेवाळे, पंकज गायकवाड, पंकज जाधव, युवराज खरे, विजय गोळे, रौंदळ, भामरे उपस्थित होते. मोहिमेत ३ लाख ६४ हजार ७८९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे, तर ८० हजार घरांना भेट दिली जाणार आहे. त्यासाठी ३५९ वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण शोधमोहिमेसाठी येणाऱ्या आरोग्यसेवक, सेविका यांना सहकार्य करावे. संशयित रुग्णांची माहिती आरोग्य कर्मचाऱ्याला देऊन लपलेल्या कुष्ठ आणि क्षय रुग्णांना लवकरात लवकर ओळखून उपचाराखाली आणणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे आणि खरी माहिती द्यावी तसेच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. हेमंत अहिरराव यांनी केले.
कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण सर्वेक्षणाची संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. क्षयरोग व कुष्ठरोगाची बाधा झाल्याचे आढळून आलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्याची तजवीज केली जाणार आहे . खासगी वैद्यकीय व्यावसायिक, एक्स-रे केंद्र , प्रयोगशाळा यांनी निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णाची माहिती क्षयरोग विभागास कळविणे बंधनकारक आहे, अशी माहिती देण्यास कसूर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
ही आहेत लक्षणे...
जास्त खोकला येणे, शरीराचे वजन झपाट्याने कमी होणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत, तर त्वचेवर फिकट लालसर चट्टे, जाड बधिर तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी, कानाच्या पाळ्या जाड होणे ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत.
फोटो : ०५ सटाणा : कॅप्शन : ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कुष्ठ व क्षयरोग शोधमोहिमेचा शुभारंभ करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, डॉ. संजीवनी क्षीरसागर आदी.