येवल्यात महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:40+5:302021-03-10T04:15:40+5:30
यावेळी येवला तालुका पंचायत समिती मध्ये उमेद अभियान कक्षात येवला तालुक्यातील सुमारे १,२०० महिला स्वयंसहायता समूहातील सुमारे १२ ...
यावेळी येवला तालुका पंचायत समिती मध्ये उमेद अभियान कक्षात येवला तालुक्यातील सुमारे १,२०० महिला स्वयंसहायता समूहातील सुमारे १२ हजार कुटुंबाचे नेतृत्व करणारे, तसेच उमेद अभियानाचे काम करणाऱ्या सी.आर.पी. समुदाय ससांधन महिला वर्गाचा सन्मान करण्यात आला.
पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी महिलांच्या उमेद अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचे कौतुक करत ग्रामीण भागातील महिलांना उद्योग, व्यवसाय सुरू करून महिला संघटन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. डॉ.कांबळे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक काळजी, आहार, व्यायाम आणि आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख उमेदचे तालुका व्यवस्थापक डी.एच.जैन, आर.डी.आढागंळे, आर.आर.भोरे, गौरव मकासरे, प्रभाग समन्वयक स्मिता मडावी, संतोष भटकर, शुभम पवार, विशाल ठमके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी.एच.जैन यांनी, तर आभार प्रदर्शन गौरव मकासरे यांनी केले.
फोटो - ०९ येवला पंचायत समिती
येवला पंचायत समितीमध्ये महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी उमेश देशमुख. समवेत सभापती प्रवीण गायकवाड आदी.
===Photopath===
090321\09nsk_26_09032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०९ येवला पंचायत समिती येवला पंचायत समितीमध्ये महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी उमेश देशमुख. समवेत सभापती प्रवीण गायकवाड आदी.