मालेगावी लसीकरण नोंदणी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:14 AM2021-05-06T04:14:25+5:302021-05-06T04:14:25+5:30
संगमेश्वर : मालेगावी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने लसीकरण नोंदणी कार्यालयाचा शुभारंभ भाजप गटनेते सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ...
संगमेश्वर : मालेगावी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने लसीकरण नोंदणी कार्यालयाचा शुभारंभ भाजप गटनेते सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष युवराज गीते यांच्या संकल्पनेतून कोरोना लसीकरण नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
नगरसेवक गायकवाड यांच्या हस्ते नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख नितीन पोफळे, नगरसेवक राजेंद्र शेलार, भरत बागुल, पंकज बिरारी, नेविलकुमार तिवारी, मंगेश बिरारी, दीपक खैरनार, जयेश गीते, सनी वडणेरे, अर्जुन भाटी, विशाल बहाद्दरपूरकर, विशाल जेधे, लतिकेश सोनवणे, नितीन जाधव, राहुल जाधव, बाळा वारुळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, १८ वयोगटापासून पुढे प्रत्येक नागरिकाने आपली लसीकरण नोंदणी करून लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन भाजयुमो सरचिटणीस श्याम देवरे यांनी केले.