लोकसहभागातून परसुल धरणातून गाळ काढण्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:58 PM2018-03-30T14:58:00+5:302018-03-30T14:58:00+5:30

उमराणे : येथील जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून लोकसहभागाने उमराणे येथील ब्रिटीशकालीन परसूल धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

Launch of mud from the people of the people from the people's fort | लोकसहभागातून परसुल धरणातून गाळ काढण्याचा शुभारंभ

लोकसहभागातून परसुल धरणातून गाळ काढण्याचा शुभारंभ

Next

उमराणे : येथील जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून लोकसहभागाने उमराणे येथील ब्रिटीशकालीन परसूल धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. उमराणे येथे सन १८८५ साली ब्रिटीश काळात परसूल धरण बांधलेले आहे. १३२ वर्षांपुर्वी बांधलेल्या या धरणात ७० चौरस कि.मि. पाणलोट क्षेत्रातून पाण्याबरोबर हजारो घिनमटर गाळ वाहून आल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता ११८ द.ल.घ.फु.वरून ५८ द.ल.घ.फुटावर आली आहे.धरणाच्या सुमारे १०० ते १५० एकर संचयक्षेत्रात १५ ते २५ फुट उंचीचा गाळाचा थर साचलेला आहे. ही बाब लक्षात घेऊन सलग पाच वर्षापासून धरणातील गाळ काढण्याचा उपक्र म जाणता राजा मित्र मंडळाने संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने हाती घेतला आहे. या वर्षीही गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी देवळा तालुका तहसिलदार कैलास पवार होते.प्रमुख अतिथी म्हणुन पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी श्री.व्ही.एम इंगळे, बोरसे, बाजार समतिीचे माजी सभापती विलास देवरे, माजी सरपंच सुभाष देवरे, सभापती राजेद्र देवरे, शेतकी संघाचे संचालक संदीप देवरे, रत्नाकर देवरे, बाळासाहेब देवरे, मंडळ अधिकारी बि.व्ही.अिहरराव, तलाठी सुभाष पवार, जयस्वाल, ग्रामसेवक जी.ए.झाल्टे, दहीवडचे सरपंच आदिनाथ ठाकूर, ग्रा.प.सदस्य सचिन देवरे, दगडू जमधाडे सुभाष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नंदन देवरे, हेमंत देवरे, चिंतामण देवरे, किरण सोनार, उमेश देवरे, बाळा पवार, अविनाश देवरे, प्रदीप देवरे, तात्या देवरे, सुशील देवरे, सुनील देवरे, दिपक देवरे, सचिन देवरे, आबा देवरे, केदा सोनवणे, दीपक देवरे, रु पेश जाधव, शरद नंदाळे, शिवराजे देवरे, हिरामण देवरे, भाऊसाहेब पाटील, काकाजी पवार, अंबादास मांडवडे उपस्थित होते.

Web Title: Launch of mud from the people of the people from the people's fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक