पाथरे येथे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:50 PM2020-09-17T15:50:20+5:302020-09-17T15:55:16+5:30
पाथरे : येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. येथील आरोग्य उपकेंद्रा मार्फत पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या गावातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.
पाथरे : येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. येथील आरोग्य उपकेंद्रा मार्फत पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या गावातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.
पाथरे येथील एकूण १५ कर्मचारी यात सहभागी होणार असून चार पथक राहणार आहे. एका पथकात तीन जनांचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे संदेश, संशयित कोविड बाधित शोधणे, कोविड रूग्ण शोधणे यावर भर दिला जाणार आहे. सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू असताना जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी तसेच कोविड प्रादुर्भाव नियंत्रण मिळवण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर यादरम्यान सुरू राहणार आहे. गृह भेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक असे पथक असणार आहे. एक पथक एका दिवसात पन्नास घरांना भेटी देतील. इन्फ्रारेड थरमोमीटर, पल्स आॅक्शन मीटर याद्वारे कुटुंबांची तपासणी होणार आहे. संपूर्ण कुटुंबाची आरोग्य बद्दलची माहिती घेण्यात येणार आहे तसेच कोविड बद्दल घ्यावयाची काळजी सांगितले जाणार आहे. संशयितांना पुढील तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात अथवा शासकीय रुग्णालयात पाठवणार आहे. पाथरे उपकेंद्रात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
मोहिमेची उद्दिष्टे :-
गृह भेटीद्वारे संशोधक तपासणी व उपचार .
अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण.
रुग्णांचे भेटीद्वारे सर्वेक्षण होईल तपासणी आणि उपचार.
प्रत्येक नागरिकांचे कोरोना बाबत आरोग्य शिक्षण.