नमामि गोदा फाउंडेशनचा शुभारंभ : प्रदूषणमुक्तीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 08:35 PM2017-08-19T20:35:28+5:302017-08-19T20:35:33+5:30

‘मी या नाशिकचा भूमिपुत्र असून, गोदावरीचा सेवक आहे. गोदामाईला निरोगी व निर्मळ ठेवणे हे माझे कर्तव्यच असून, त्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार अन् इतरांनाही प्रवृत्त करणार...’ असा संकल्प नमामि गोदा फाउंडेशनच्या शुभारंभप्रसंगी नाशिककरांनी केला.

Launch of Namami Goda Foundation: Resolution of Declaration of Pollution | नमामि गोदा फाउंडेशनचा शुभारंभ : प्रदूषणमुक्तीचा संकल्प

नमामि गोदा फाउंडेशनचा शुभारंभ : प्रदूषणमुक्तीचा संकल्प

googlenewsNext

नाशिक : ‘मी या नाशिकचा भूमिपुत्र असून, गोदावरीचा सेवक आहे. गोदामाईला निरोगी व निर्मळ ठेवणे हे माझे कर्तव्यच असून, त्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार अन् इतरांनाही प्रवृत्त करणार...’ असा संकल्प नमामि गोदा फाउंडेशनच्या शुभारंभप्रसंगी नाशिककरांनी केला.
गोदावरी सन्मान आणि तिच्या प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गोदा फाउंडेशन’ची स्थापना केली असून, त्याचा शुभारंभ शनिवारी (दि.१९) विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक, लोकप्रतिनिधींनी गोदावरीला शुद्ध व निर्मळ बनविण्याची प्रतिज्ञा केली. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अभिनेता चिन्मय उद््गीरकर, धनश्री क्षीरसागर, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, मिलिंद दंडे, अ‍ॅड. शिरिष दंदणे, सुमित ओढेकर, प्रा. राम कुलकर्णी, सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय नद्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकारी पातळीवर नमामि गंगा, नमामि नर्मदासारखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे; मात्र  गोदावरीला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनातर्फे फ ारसे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे जनसामान्यांनी ‘नमामि’ शब्दाला प्रामाणिक राहून प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाचा शुभारंभ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, गोदावरी नदी ही दुसºया क्रमांकाची  नदी असून, या नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत त्र्यंबकेश्वर ते नाशिकपर्यंत संपुष्टात आणले गेले. यामुळे गोदावरीचा प्रवाह धोक्यात सापडून नाशिककरांची गोदामाई मृतशय्येवर पोहचून ‘आयसीयू’मध्ये दाखल झाली आहे. नाशिककरांनी पुढाकार घेत ‘नमामि गोदा’ची स्थापना के ली ही भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. गोदावरी नदीवरील श्रद्धा व निष्ठेचे स्मरण करून प्रामाणिकपणे कार्य करत चळवळ यशस्वी करण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा, असे आवाहन राजेंद्रसिंह यांनी यावेळी केले.

Web Title: Launch of Namami Goda Foundation: Resolution of Declaration of Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.